विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील शास्त्रीनगर चौकात एका बड्या बापाच्या मुलाने अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. गाडी चालवणाऱ्या तरुणाचं नाव गौरव अहुजा असल्याची माहिती आहे. पुण्यातील एका बारचे मालक मनोज अहुजा यांचा तो मुलगा आहे.
मनोज आणि त्याचा मित्र दारु पिऊन भरधाव वेगात गाडी चालवत होते. भररस्त्यात गाडी थांबवून त्याने शेजारीच लघुशंका केली. त्याला हटकल्यानंतर महिलांसमोरच त्याने जीन्स खाली करत अश्लील वर्तन केले. शनिवारी सकाळी म्हणजेच जागतिक महिला दिनीच पुण्यात ही घटना घडली. हा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
अत्यंत गजबजलेल्या शास्त्रीनगर चौकात हा प्रकार घडला आहे. संबंधित तरुण आणि त्याच्या मित्राने दारु प्यायली होती. यानंतर अश्लील वर्तन करण्यात आले.
याबाबत पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव म्हणाले, सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. चौकात लघुशंका करत अश्लील वर्तन केले. CCTV आधारे नाव निष्पन झाले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नातेवाईक आणि मित्रांकडे शोध घेत आहोत. आई वडिलांसोबत संपर्क झाला आहे.
Drunk son of a bar owner behaves obscenely in front of women, a type of incident in Pune on Women’s Day
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाप्रमाणे इतर विभागातील घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? नाना पटोले यांचा सवाल
- रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी चौघांना अटक, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते
- Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी
- Sanjay Raut जसा नेता तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल