विशेष प्रतिनिधी
पुणे : पैशाची गुर्मी आणि नशेच्या आहारी गेलेले काही तरुण समाजकंटकासारखे वागत आहेत. पोलिसांनी आणि प्रशासनाने यावर कठोर कारवाई करायला हवी, असा संताप विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला आहे. Dr. Neelam Gorhe
पुण्यातील मुख्य चौकात एका तरुणाने उद्दामपणा करत भर रस्त्यात अश्लील हावभाव करत लघुशंका केल्याच्या घटनेची त्यांनी गंभीर दखल घेतली.
गोऱ्हे म्हणाल्या की, “या घटनेतील तरुणाचा तपशील पोलिसांना मिळाला असून लवकरच त्याच्यावर कारवाई होणार आहे. पुणे शहरातील रस्त्यांवरील सर्व सीसीटीव्ही मार्च महिन्यात कार्यान्वित होतील. पोलिसांना या घटनेचे फुटेज मिळाले असल्याची माहिती त्यांनी दिली.
तसेच शहरातील अशा वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी. राजकीय श्रेयवाद न खेळता सर्वांनी मिळून समाजात शिस्त आणि सुरक्षितता राखण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. सरकारने पोलिसांना अधिक स्वायत्तता द्यावी आणि नागरिकांनीही जबाबदारीने वागावे,” असे त्यांनी सांगितले.
“ही घटना केवळ पुण्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण राज्यात अशा प्रकारच्या बेशिस्त आणि मुजोर वर्तनाची समस्या वाढत आहे. . काही पालक आपल्या मुलांच्या चुकीच्या वागण्यावर पांघरूण घालत असल्यामुळे अशा घटना घडतात. हे प्रकार थांबवण्यासाठी समाज, कुटुंब, पोलीस आणि सरकारने एकत्रितपणे कठोर भूमिका घेतली पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.
एका तरुणाने एका गाडीतून उतरून मुख्य चौकात लघुशंका केली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या महिलांनी विरोध केला असता त्याने उद्दामपणा केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
Dr. Neelam Gorhe is angry that the youth who are addicted to money and drugs are behaving like a thorn in the society.
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाप्रमाणे इतर विभागातील घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? नाना पटोले यांचा सवाल
- रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी चौघांना अटक, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते
- Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी
- Sanjay Raut जसा नेता तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल