क्रूर, लुटारू औरंगजेबाचे खानदानच लुटेरे, बाबा रामदेव म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजच आमचे आदर्श

क्रूर, लुटारू औरंगजेबाचे खानदानच लुटेरे, बाबा रामदेव म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजच आमचे आदर्श

Baba Ramdev

विशेष प्रतिनिधी

नागपूर : आपला सगळ्यांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत. क्रूर , लुटारू औरंगजेब आमचा आदर्श असूच शकत नाही, असे योगगुरु बाबा रामदेव यांनी सांगितले.

बाबा रामदेव यांच्या पतंजलीने विदर्भात सुरू केलेल्या हर्बल प्लँटच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, औरंगजेब भारताचा आदर्श असूच शकत नाही, तो क्रूर होता. औरंगजेब लुटारु होता त्याचं कुटुंब लुटारु होतं. बाबर काही भारतात काही घडवायला आला नव्हता. बाबर, अकबर, औरंगजेब त्यांची मुलं या सगळ्यांनी हरम तयार केले. आपल्या हजारो आया-बहिणींची त्यांनी बेअब्रू केली. आपल्या देशाची ओळख पुसण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अशी माणसं आपला आदर्श असूच शकत नाहीत.

फूड पार्कची माहिती देताना बाबा रामदेव म्हणाले, फूड पार्कची रोजची क्षमता ८०० टन इतकी आहे. यातून नैसर्गिक पद्धतीने ज्यूस तयार करून मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना समृद्धी मिळणार आहे. आज संत्र्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या पद्धतीचे रोपे तयार करण्यासाठी नर्सरी तयार करू. अन्य प्रकारची जी फळं आहेत, त्यांचाही नैसर्गिक पद्धतीने ज्यूस काढण्याचं काम करू. संत्री निर्यात करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करू. विदर्भला लागून गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान लगतच्या राज्यातून संत्रा आणण्यासाठी जाऊ. जय जवान, जय किसान, जय मिहान हे महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करू, असंही रामदेवबाबा म्हणाले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर बाबा रामदेव म्हणाले, ट्रम्प यांनी टेरिफ टेररिझमचा नवीन पायंडा पाडला आहे. त्यांनी लोकशाही पायदळी तुडवली आहे. ते वर्ल्ड बँकेचेही ऐकत नाहीत. डॉलरची किंमत वाढवली, गरीब विकसनशील देशांच्या पैश्यांची किंमत कमी करून एक प्रकाराने आर्थिक दहशतवाद डोनाल्ड ट्रम्प चालवत आहेत. ट्रम्प, पुतीन, शी जिनपिंग यांचा भरवसा नाही. भारताला विकसनशील बनवलं पाहिजे. काही शक्तीशाली देश जगाला विनाशाकडे नेण्याचा काम करत आहेत. त्यासाठी भारतीयांनी एकजुटीने सशक्त राष्ट्र निर्माण करत विध्वंसक ताकदीला उत्तर दिले पाहिजे, असं आवाहन रामदेवबाबांनी केलं.

युरोप, अमेरिका ब्रिटन येथे मंदिरांवर हल्ले करून या पद्धतीने सनातन धर्मांवर निशाणा साधला जात आहे. मजहबी आतंकवाद पसरविला जात आहे, हे दुर्दैवी आहे. यासाठी सर्व देशांने यावर उपाय शोधला पाहिजे, यासाठी पुढाकार भारताने घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

The cruel Aurangzeb’s family looting, Baba Ramdev said Chhatrapati Shivaji Maharaj is our role model

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023