विशेष प्रतिनिधी
मुंबई : परवा जे अनाजीपंत जोशी, घाटकोपरमध्ये बडबडून गेले. म्हणाले घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे. तुमच्या बापाने आम्हाला मुंबई दिली नाही, ती मराठी माणसाने लढून बलिदान करून मिळवली आहे,” असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केला
ईशान्य मुंबईत निर्धार शिबीरात ते बोलत होते. घेतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी वादग्रस्त विधान केले. घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे,” असे विधान केले होते. त्यांनंतर राज्यात अनेकांनी यावर टीका केली होती. यावरून उद्धव ठाकरे यांनी संघावर टीका केली.
ठाकरे म्हणाले, भाजपा दैवतावरून भांडणं लावत आहे. तुम्ही हिंदुत्व नासवून टाकत आहात. बांगलादेश, पाकशी क्रिकेट खेळणाऱ्यांनी हिंदुत्व शिकवू नये अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली आहे. मी महाराष्ट्रात मराठी आणि देशात हिंदू आहे.
- चक्क बांग्लादेशीनी घेतला प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा लाभ, किरीट सोमय्या यांनी दिले पुरावे
महाराष्ट्राची अस्मिता तुडवली जात आहे. मुंबईचं महत्त्व कमी केलं जातं आहे. शिवसेनेच्या मुळापर्यंत कोणीही पोहोचणार नाही. माझा जीव ‘वर्षा’वर नाही तर शिवसैनिकांमध्ये अडकला आहे. संजय राऊतांना घाबरून तुरुंगातून सोडलं अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली
उद्धव ठाकरे म्हणाले की, “२०१२ साली आपण फक्त दोन शब्दांवर मुंबई जिंकली होती, ‘करून दाखवलं’, २०१७ ला पण तेच केलं. देवेंद्र फडणवीस यांना म्हणावं कोस्टल रोड हे कर्तृत्व तुमचं नाहीये, माझ्या शिवसेनेचं आहे. त्याचं भूमिपूजन मी केलेलं आहे. शिवडी नावाचा जो लिंक रोड आहे तो सुद्धा जरी तुम्ही सुरू केला असला तरी त्याचा पहिला गर्डर मुख्यमंत्री म्हणून मी माझ्या हाताने टाकलेला आहे. करोना काळात मी काम बंद पडू दिलं नव्हतं. मेट्रोची कामे मी बंद पडू दिली नव्हती.
कोस्टल रोडचं काम बंद पडू दिलं नव्हतं. रुग्णालयात देखील ज्या तुम्हाला कधी आयुष्यात जमल्या नसत्या एवढ्या सेवा सुविधा आम्ही महाराष्ट्राला उपलब्ध करून दिल्या होत्या. फक्त तुमच्या मालकांच्या मित्रांची हुजरेगिरी मी केली नाही म्हणून मी उद्धव ठाकरे नाही… तुम्ही उद्धव ठाकरे नाहीच आहात आणि होऊ शकतच नाहीत. ही लढाई पक्षाची लढाई नाही. ही लढाई राजकीय लढाई नाही. ही आपल्या मातृभाषेच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Your father did not give Mumbai, Marathi people fought for it, Uddhav Thackeray criticizes Rashtriya Swayamsevak Sangh
महत्वाच्या बातम्या
- चक्क बांग्लादेशीनी घेतला प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा लाभ, किरीट सोमय्या यांनी दिले पुरावे
- पैशाची गुर्मी, नशेच्या आहारी गेलेले तरुण समाजकंटकासारखे वागताहेत, डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संताप
- माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांचा आत्महत्येचा प्रयत्न? अन्नातून विषबाधा झाल्याचा कुटुंबाचा दावा
- बड्या बापाच्या मद्यधुंद मुलाचे महिलांसमोर अश्लील वर्तन, महिला दिनीच प्रकाराने संताप