बखर ऐतिहासिक दस्तऐवज पूर्वीच्या काळी ज्या स्वरुपात जतन होत होते त्यात सर्वात महत्वाचे कार्य हे आपल्या बखरींचे होते. त्यामुळेच आज अनेक वर्षांपूर्वीचा इतिहास आपल्याला ज्ञात होतो आहे.बखर लाईव्ह हे युट्युब चॅनल असून डिजिटल स्वरुपात आता आपल्या भेटीस येत आहेत. ऐतिहासिक बखरीप्रमाणेच आमचे हे युट्युब चॅनल आपल्या सर्व प्रकारच्या घडामोडी आपल्याला मिळणार आहेत.‘बखर लाईव्ह’ मध्ये प्रत्येक बातमी ही त्याची वस्तुनिष्ठता आणि सत्यता पडताळून दिली जाते. संशोधित आणि विश्लेषणात्मक बातम्यांना वाचकांपर्यंत पोहोचवणे हे‘बखर लाईव्ह’ चे उद्दिष्ट आहे.कोणत्याही खोट्या बातम्या अथवा मजकूर आम्ही प्रसिध्द करत नाही. विविध राजकीय घडामोडी, आपल्या गावातल्या, शहरातल्या, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडी आपल्या पर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.आमचा प्रवास हा महाराष्ट्रातील वाचकांना आपल्या संस्कृतीचे, मूल्यांचे सार प्रतिबिंबित करणाऱ्या बातम्यांचे विश्वसनीय स्रोत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुरू झाला. आता आम्ही आणखी एक पाऊल पुढे टाकत आहोत. देशभरातील बातम्या, विविध राज्यातील भाषिकांपर्यंत पोहचवत आहेत.