कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम आणि शरद पवार यांचे संबंध याची गेल्या 40 वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी याच मुद्यावर 1995 साली झालेल्या निवडणुकांत शरद पवारांना सळो की पळो करून सोडले होते.
त्यामुळेच 1995 साली महाराष्ट्रात प्रथमच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या काँग्रेसचा पराभव होऊन शिवसेना- भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार सत्तेवर आले.त्याच काळात मुंबईचे माजी उपायुक्त गो. रा. खैरनार यांनी शरद पवार यांच्या विरोधात मोठे रान उठविले होते. त्यांनीही दाऊदचे शरद पवारांशी संबंध असल्याचे आरोप केले होते.
आऊटलूक या मासिकाने 14 फेब्रुवारी 1996 रोजी व्होरा कमिटीच्या अहवालाच्या आधारे एक वृत्त दिले आहे. या अहवालात शरद पवार आणि काँग्रेसच्या काही तत्कालीन नेत्यांवर दाऊदशी संबध असल्याचा आरोप केलेला होता.
याची नव्याने चर्चा होण्याचे कारण म्हणजे भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी शरद पवारांवर केलेले आरोप. देशाचे गृहमंत्री म्हणून सरदार वल्लभभाई पटेल, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले आहे. पण यापैकी कोणालाही आपल्या राज्यातून तडीपार केले गेले नव्हते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर मंगळवारी हल्ला चढवला. यावर भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी उत्तर देताना पवार आणि दाऊद यांच्या संबंधांची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे.
दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीनसारखा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी याच्या एन्काऊंटरमध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल. अमित शहांची तडीपारी दरोडा-चोरीसाठी नव्हती, असा हल्लाबोल भाजपाचे तावडे यांनी शरद पवारांवर केला आहे. दाऊद इब्राहिमच्या हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे बहुदा पवार विसरले आहेत, असेही ते म्हणाले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून पवारांवर असे आरोप होत आहेत. मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी दुबई विमानतळावर दाऊद इब्राहिमची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान दाऊदने शरद पवार यांना सोन्याचा हार दिला, असा असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. शरद पवार हे मुख्यमंत्री असताना त्यांनी 1989 ते 1991 या कालावधीत मुंबई ते इंग्लंड आणि तिथून कॅलिफोर्निया, तसेच कॅलिफोर्नियातून पुन्हा इंग्लंडला येऊन ते दुबईत गेले होते. मुख्यमंत्री असल्याने त्यांना आपल्या दौऱ्याची कल्पना केंद्र सरकारला देणे अपेक्षित होते. त्यांनी तशी कल्पना केंद्र सरकारला दिली होती का? केंद्र सरकारने त्याबाबतचा काही अहवाल सादर केलाय का? या दौऱ्याचा तपशील उपलब्ध आहे का आणि या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी दुबई येथे जाऊन दाऊद इब्राहिम याची भेट घेतली होती. या भेटीचा उल्लेख आहे का? दाऊद इब्राहिमच्या या भेटीबाबत काय तपशील आहे? हा तपशील शरद पवार यांनी स्पष्ट केला आहे का? असे प्रश्न ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केले होते.
शरद पवारांनी साखळी बॉम्बस्फोटातील तेरावा बॉम्बस्फोट मुस्लिम वस्तीत झाल्याची खोटी माहिती दिली. तसेच त्यांनी दाऊदसोबत हेलिकॉप्टरनं प्रवासही केला होता, असा आरोपही शरद पवारांवर केला जातो. मात्र ते आजपर्यंत कुणीच सिद्ध करु शकलेलं नाही.
पुण्यात 2018 साली शोध मराठी मनाचा या कार्यक्रमात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीतही दाऊदशी असलेल्या कथित संबंधांबाबत पवारांना विचारले होते. त्यावेळी शरद पवारांनी सांगितले होते की एका पत्रकाराने दाऊदच्या भावाची मुलाखत घेतली.
दाऊदच्या भावाला बरेच प्रश्न विचारले. त्याला विचारलं, ‘तुम्ही मुंबईला का येत नाहीत?’ त्याने सांगितले, ‘तिथले सरकार आमच्या विरोधी आहे आणि आम्हाला तिथे अटक केल्याशिवाय राहणार नाही. आमची यायची इच्छा आहे. आमचा जीव अस्वस्थ आहे. मुंबईशिवाय आम्हाला चैन पडत नाही. पण आम्हाला जाता येत नाही.‘ त्याने प्रश्न विचारला, मुंबईत कोण आहेत वगैरे. त्याने दिलीपकुमार माहित आहेत का, आणखी तीन-चार नटांची नावं घेतली. दाऊदचा भाऊ म्हला, ‘हो, आमचे आवडते नट आहेत.’ त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. त्याने विचारलं, मुख्यमंत्री शरद पवार माहित आहेत का? दाऊदचा भाऊ म्हणाला, ‘उनको कौन नहीं जानता? वो तो हमारे चिफ मिनिस्टर है..सब हम जानते है…”
पवार म्हणाले होते “दुसऱ्या दिवशी बातमी आली की, “दाऊदचा भाऊ म्हणतो, शरद पवारांना आम्ही जाणतो.” आणि नंतर देशाच्या लोकसभेमध्ये आमचे परममित्र राम नाईकांनी प्रश्न विचारला, “दाऊदचा भाऊ म्हणतो, यांना ओळखतो, मग यांची चौकशी करणार का?” झालं.. सगळीकडे दाऊद.. दाऊद.. दाऊद.. झालं.”
1993 च्या मुंबई स्फोटानंतर शरद पवारांवर प्रथम आरोप झाले. या आरोपांबाबत शरद पवारांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्रात सविस्तरपणे भूमिका मांडलीय.
शरद पवारांच्या म्हणण्यानुसार, जनसत्ता या हिंदी दैनिकाच्या प्रतिनिधीने दुबईला जाऊन दाऊदचा भाऊ नुरा याची मुलाखत घेतली. त्यावेळी या प्रतिनिधीने नुराला विचारलं की, “तुम्ही शरद पवार यांना ओळखता का?” दाऊदच्या भावानं म्हणजे नुरानं उत्तर दिलं की, “आमचा जन्म मुंबईतला. शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांना कोण नाही ओळखत?”
पवारांच्या दाव्यानुसार, विरोधकांनी याच वाक्याचा आधार घेत सूतावरून स्वर्ग गाठला.
Dawood Ibrahim has not left Sharad Pawar for the last 40 years?
महत्वाच्या बातम्या
- शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
- कुणाशी जरी लागेबांधे असले तरी आरोपीला सोडणार नाही, एकनाथ शिंदे यांची ग्वाही
- प्रजासत्ताकदिनी काँग्रेसची ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅली
- सर्वोच्च न्यायालयात निर्णय झाला तर तीन-चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मुख्यमंत्र्यांची माहिती