Tasgaon Kawathe सांगली पॅटर्नची चर्चा, आर. आर पाटलांच्या लेकालाही कट्टर विरोधकांशीच लढावे लागणार

Tasgaon Kawathe सांगली पॅटर्नची चर्चा, आर. आर पाटलांच्या लेकालाही कट्टर विरोधकांशीच लढावे लागणार

Tasgaon Kawathe

तासगाव कवठे महांकाळ

तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघ म्हटला की माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचे नाव आठवते. राज्याच्या राजकारणात सत्तेचे अनेक पदे मिळवली मात्र स्वतःच्या मतदारसंघातील राजकारण त्यांच्यासाठी कधीच सोपे राहिले नाही. त्यांचा मुलगा रोहित पाटील आमदारकी तयारी करत असताना त्यालाही याच कट्टर विरोधाचा सामना करावा लागणार आहे. Tasgaon Kawade Mahankal R. R. Patil’s son will have to fight against staunch opponents.

माजी खासदार संजयकाका पाटील आणि आर. आर. पाटील यांच्या तीव्र संघर्ष होता. त्यावरून गावोगावी दुफळ्या माजल्या होत्या. आर आर पाटील यांच्या निधनानंतर सहानुभूतीच्या लायेत त्यांच्या पत्नी सुमंतताई निवडून आल्या. यंदाची निवडणूक मात्र त्यांचा मुलगा रोहित पाटील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून निवडणूक लढविण्याची तयारी करत आहे. त्यांच्या विरोधात संजयकाका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील भारतीय जनता पक्षाकडून रिंगणात उतरणार आहेत. हातच दुरंगी सामना होणार असे वाटत असतानाच अजित घोरपडे यांचे नावे समोर आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या नेतृत्वात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होऊ शकतो. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी देखील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित घोरपडे यांच्या सोबत राहण्याचे जाहीर केले आहे. माजी मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांच्या नातवाचा पाठिंबा अजित घोरपडे यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

लोकसभेला जसा अजितराव घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नाही तसा विधानसभेला देखील त्यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे वक्तव्य विशाल पाटील यांनी केले.विशाल पाटील यांनी केलेल्या विधानामुळे येथील राजकारणाला वेगळे वळण मिळत असल्याचे दिसत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र आता या मतदारसंघात ही दोन्ही घराणी नकोत म्हणून तिसरी आघाडी अजित घोरपडे यांच्या नेतृत्वात तयार होताना दिसत आहे.या तिसऱ्या आघाडीमुळे रोहित पाटील यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित घोरपडे हे 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढले होते. त्यावेळी आर आर पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. 2019 मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढताना सुमनताई पाटील यांनी त्यांना हरविले.

गेली अनेक वर्षे तासगाव-कवठेमहांकाळची आमदारकी स्व. आर. आर. पाटील यांच्या घरातच आहे. त्यांच्या विरोधात स्व. दिनकर (आबा) पाटील यांचा तसेच माजी खासदार संजय पाटील यांचा गट निवडणुकीत उतरत होता.अंजनी म्हणजे आर आर पाटील आणि चिंचणी म्हणजे संजयकाका पाटील या दोन्ही गावच्या नेत्यांनीच आजपर्यंत तालुक्यात आणि मतदारसंघाचे राजकारण केले आहे. मात्र यात आता तिसरी आघाडी निर्माण झाल्यावर मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
गेल्या तीन निवडणुकातील लढती

2019 विधानसभा

सुमन पाटील  |  राष्ट्रवादी  |  १२८३७१

अजितराव घोरपडे  |  शिवसेना  | ६५८३९

2014 विधानसभा

आर. आर. पाटील  |  राष्ट्रवादी  |  १०८३१०

अजितराव घोरपडे  |  भाजप |  85900

सुरेश शेंडगे  |  काँग्रेस |  ३४७३

2009 विधानसभा

आर.आर. पाटील  |  राष्ट्रवादी |  ९९१०९

दिनकर पाटील |  शिवसेना  |  ३३९३६

Tasgaon Kawathe Mahankal R. R. Patil’s son will have to fight against staunch opponents.

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023