विशेष प्रतिनिधी
बीड : बीडमधील मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपींचे एकत्रित सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. सुदर्शन घुले आणि बालाजी तांदळे कृष्णा आंधळे, प्रतीक घुले, विष्णू चाटे यांच्याबरोबर वाल्मीक कराडही दिसत आहे. त्यामुळे कराडच्या अडचणी वाढणार आहेत.
वादा पवन ऊर्जा कंपनीकडे खंडणी मागितली त्याच दिवशी सर्व आरोपी एकत्र आल्याचे व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. सीसीटीव्ही व्हिडिओत वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि बालाजी तांदळे एकत्र असल्याचे दिसून आले आहे. तसेच इतर आरोपी कृष्णा आंधळे, प्रतीक घुले, विष्णू चाटेदेखील यात दिसले आहेत.
२९ नोव्हेंबर २०२४ चे सीसीटीव्ही फुटेज असल्याचे सांगितले जात आहे. त्यासंबंधीचा व्हिडिओ उघडकीस आला आहे. या व्हिडिओत पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटीलही यात आढळून आले आहेत. हा सीसीटीव्ही व्हिडिओच्या रुपाने या प्रकरणातील खूप महत्त्वाचा डिजिटल पुरावा होऊ शकतो.
Rohit Pawar : रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाचे डोहाळे, म्हणाले शरद पवार भाकरी फिरविणार
विष्णू चाटेच्या कार्यालयाबाहेरील हे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या सीसीटीव्ही फुटेजमुळे खंडणी प्रकरणात जामीन मिळवण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोक्का लावण्यात आलेल्या सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश आहे.
९ डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर राज्यात या घटनेचे पडसाद बघायला मिळाले होते. विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीही या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. या घटनेचा निषेध म्हणून राज्यातील विविध ठिकाणी मोर्चेही काढण्यात आले होते. मात्र खुनाच्या गुन्ह्यात वाल्मीक कराड याला मोकळे सोडले आहे.
Walmik Karad along with all accused in Santosh Deshmukh murder case goes viral
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचा कालच्या भाषणात रोख कोणाकडे होता? षडयंत्र कोणी रचले? छगन भुजबळ यांचा सवाल
- Donald Trump ट्रम्प अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष; प्रत्येक धोक्यापासून अमेरिकन संविधानाचे रक्षण करण्याची घेतली शपथ
- Rahul Shewale : दुसऱ्या पक्षाच्या उदयापेक्षा स्वत:च्या पक्षाच्या अस्ताची चिंता करा, राहुल शेवाळे यांचा टोला
- कसला उदय होणार? तथ्यहीन बातम्या, अजित पवार यांनी फटकारले