विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्याने पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे केजरीवाल यांचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळे आता त्यांचा पंजाबच्या मुख्यमंत्री पदावर डोळा असल्याची चर्चा सुरु झाली आहे. विद्यमान मुख्यमंत्री भगवानसिंहमान यांच्यावर काहीतरी बालंट आणून त्यांना हटविण्याची तयारी केजरीवाल यांनी सुरु केली आहे.
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे भाजपने एकनाथ शिंदे याना फोडून सत्तांतर घडविले त्याच पद्धतीने मान यांनाही फोडले जाईल, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी केजरीवाल हे पंजाबच्या मुखमंत्री पदासाठी आग्रही असल्याचा दावा केला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील आमदारांची बैठक बोलावली. अशावेळी असे सांगण्यात येत आहे की, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावरल केजरीवाल हे खोटे आरोप करतील. महिलांना पैसे देण्याचे आश्वासन त्यांनी केले होते. मात्र ते सत्यात उतरवले नाहीत, असे खोटे दावे करत केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पाहत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मी अरविंद केजरीवाल यांना सांगतो की, असे चुकूनही स्वप्नात विचार करू नका. कारण हे पंजाब आहे. पंजाबचे लोक या परिस्थितीला सहन करणार नाहीत. तुम्हाला मुख्यमंत्री बनवणार नाहीत. त्यामुळे मी भगवंत मान यांना आग्रह करतो की, हे होण्यापूर्वी आपण आधी सतर्क होणे गरजेचे आहे. आपण कोणाचेही सख्खे नसून त्यांनी सर्वांना धोका दिला आहे. आता पंजाबच्या लोकांसोबत धोका करणार असल्याचा दावा मनजिंदर सिंह सिरसा यांनी केला आहे.
Arvind Kejriwal eyes on the post of Chief Minister of Punjab
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन