विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नक्षलवाद विराेधी माेहीेला चांगले यश मिळत आहे. नक्षलवाद्यांच्या कारवाया कमी हाेत आहेतच पण अनेक कट्टर नक्षलवादी आत्मसमर्पण करू लागले आहेत. छत्तीसगडमधील विजापूरमध्ये रविवारी 50 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करुन हिंसाचाराचा मार्ग सोडला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिली. त्यांनी 50 नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाच्या निर्णयाचे स्वागत केले असून, या सर्वांचे पुनर्वसन करून त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेतले जाईल, असे सांगितले. त्यांनी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. 31 मार्च 2026 नंतर देशात नक्षलवाद इतिहासजमा होईल असे ठणकावून सांगितले.
अमित शहा म्हणाले, ‘विजापूर ( छत्तीसगड ) येथे 50 नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केले, ही आनंदाची बाब आहे. त्यांनी हिंसा आणि शस्त्रे सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला, त्याचे मी स्वागत करतो. जो नक्षलवादी शस्त्र सोडून विकासाचा मार्ग पत्करेल, त्यांचे पुनर्वसन करून त्यांना मुख्य प्रवाहात जोडले जाईल, असे पंतप्रधान मोदींचे धोरण स्पष्ट आहे.
इतर नक्षलवाद्यांना हिंसाचाराचा मार्ग सोडण्याचे आवाहन करत शाहा पुढे म्हणाले, मी पुन्हा एकदा उर्वरित नक्षलवाद्यांना शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन करतो. 31 मार्च 2026 नंतर देशात नक्षलवाद इतिहास राहील, हा आमचा संकल्प आहे, असेही शहा म्हणाले.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील 50 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यापैकी 14 जणांवर एकूण 68 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्या सर्वांनी राज्य पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आपले शस्त्र ठेवले. नक्षलवाद्यांना आंदोलन सोडून मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी सरकारच्या धोरणानुसार त्यांचे पुनर्वसन केले जाईल, असे एसपी म्हणाले.
50 naxalites surrender from Chhattisgarh
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
- Kunal Kamra कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकेपासून संरक्षण
- Anna Bansode : विधानसभा उपाध्यक्षपदी निवड अन् दोन दिवसात अण्णा बनसोडेंना उच्च न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश
- Prashant Koratkar प्रशांत कोरटकर यांच्यावर न्यायालयातच वकिलाचा हल्ला