विशेष प्रतिनिधी
पाटणा : Tejashwi Yadav राष्ट्रीय जनता दल (RJD) चे नेते तेजस्वी यादव यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत पुन्हा युती करण्याच्या चर्चांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी या चर्चांना “निरर्थक” म्हटले आणि असे कोणतेही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही का कुणाशीही युती करू? तुम्ही मूळ मुद्द्यांवरून लक्ष का वळवत आहात?” असा संतप्त सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत केला.Tejashwi Yadav
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना यादव म्हणाले, “कोणाकडूनही कोणतीही ऑफर आलेली नाही. आमच्या पक्षात केवळ अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि मीच आघाडीबाबत निर्णय घेण्यास अधिकृत आहोत. त्यामुळे कोणत्याही खोट्या गोष्टींवर चर्चा करू नका.”
तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या मानसिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ते आता शुद्धीत राहिलेले नाहीत, हे त्यांच्या सार्वजनिक वक्तव्यांवरून स्पष्ट होते. बिहारमध्ये दररोज शेकडो राउंड गोळ्या चालत आहेत. निर्दोष लोकांचे जीव जात आहेत.
या वक्तव्यांमुळे बिहारच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विशेषतः, लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांना पुन्हा सोबत येण्याचे आवाहन केले होते.
तथापि, तेजस्वी यादव यांनी या सर्व चर्चांना “निरर्थक” म्हटले आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीत कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले.
Alliance with Nitish Kumar again, Tejashwi Yadav angrily said that the discussion is nonsense, pointless
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray तुमच्या बापाने मुंबई दिली नाही, ती मराठी माणसाने लढून मिळवली, उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका
- Uday Samant आता मंत्री उदय सामंत अडचणीत, वडिलांच्या कंपनीने महामार्गाच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप
- खोटे आरोप करण्याची हिम्मत… धनंजय मुंडे यांचा सुरेश धस यांना इशारा
- क्रूर, लुटारू औरंगजेबाचे खानदानच लुटेरे, बाबा रामदेव म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजच आमचे आदर्श