विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Amit Shah कश्यप ऋषी यांना जगातील सर्वात सुंदर जागा असलेल्या काश्मीरचे निर्माते म्हटले जाते. त्यांच्या नावावरून आता काश्मीरचे नाव बदलले जाण्याची शक्यता आहे. खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत संकेत दिले आहेत.Amit Shah
‘J&K and Ladakh Through the Ages’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की काश्मीरचं नावं कश्यपपासून असू शकतं. शंकराचार्य, सिल्क रूट आणि हेमिश मठ याच्यावरून हे सिद्ध होतं की भारतीय संस्कृतीचा पाया हा काश्मीमध्येच घालण्यात आला. इथे सुफी आणि बौद्ध संस्कृती देखील खूप चांगल्या पद्धतीने रूजली गेली.काश्मिरी, डोगरी, बाल्टी, झंस्करारी या भाषांना सरकारने मान्यता दिली आहे. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. पंतप्रधान मोदी काश्मीर संदर्भात खूप विचार करतात. काश्मीरमधील ज्या स्थानिक भाषा आहेत त्या जीवंत राहिल्या पाहिजेत, त्यांचं जतन झालं पाहिजे असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आग्रह होता, त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे.
शहा म्हणाले की,कलम 370 आणि 35 ए हा देशाच्या एकतेमधील सर्वात मोठा अडथळा होता. मात्र आता मोदी सरकारनं हा अडथळा दूर केला आहे. कलम 370 हटवण्यात आलं आहे. त्यानंतर जम्मू -काश्मीरमध्ये विकासाची नवी गंगा आली आहे. अनेक विकास प्रकल्प या ठिकाणी सुरू आहेत.
काश्मीरचा इतिहास पुस्तकाच्या रुपानं पुढे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जगात भारत असा ऐकमेव देश आहे, जिथल्या सीमा या संस्कृती आणि परंपरेवर आधारीत आहेत. म्हणून काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत भारत एक आहे. जर तुम्हाला भारत समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला आधी तेथील संस्कृती, परंपरा समजून घ्याव्या लागतील, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. आपल्या देशाला तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटकांना तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, चुकीच्या इतिहासाची मांडणी करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला, असा आरोपही यावेळी शाह यांनी केला आहे.
Amit Shah’s signal, the name of Kashmir will be changed, it will be given the name of Sage Kashyap
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली