Hindu temple अमेरिकेत पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर हल्ला

Hindu temple अमेरिकेत पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर हल्ला

Hindu temple

विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : अमेरिकेत पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर हल्ला करत हिंदूंच्या आस्थेला ठेच पोहचवली आहे. दक्षिण कॅलिफोर्नियातील बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या (बीएपीएस) मंदिराची तोडफोड करण्यात आली. तसेच मंदिराला अपवित्र म्हणण्याची त्यांनी हिंमत केली आहे. या घटनेवर भारत नाराजी व्यक्त केली असून संबंधित घटने प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. दरम्यान, हे अज्ञातांनी कृत्य केले असल्याचे सांगण्यात येत आहे. Hindu temple

या प्रकरणी आता कॅलिफोर्नियातील बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने द्विट करत या घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, कॅलिफोर्नियातील चिनो हिल्समधील आणखी एका मंदिराची विटंबना करण्यात आली. हिंदू समुदाय या घडलेल्या घटनेविरोधात उभा आहे. चिनो हिल्स आणि दक्षिण कॅलिफोर्नियातील समुदायासोबत, आम्ही द्वेषाला कधीही द्वोष होईल असे राहणार नाही. मानवता, श्रद्धा, शांती आणि करुणेला जागरूक ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न असेल.

भारतानेही याविरोधात निषेध व्यक्त केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी यावर भाष्य केले आहे. अशा कृत्याचा आम्ही तीव्रपणे निषेध व्यक्त करतो. आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांना संबंधित कृत्यासाठी जबाबदार असलेल्यांना जागा दाखवू.

श्री स्वामीनारायण मंदिरात काही जणांनी तोडफोड केली. मंदिराच्या बाहेर जोरदार घोषणाबाजीही कऱण्यात आली. हिंदू-अमेरिका फाऊंडेशनच्या वतीने याप्रकरणाची एफबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. मंदिरात तोडफोड केल्यानंतर भारताच्या विरोधातील मजकूरही भिंतीवर लिहिण्यात आला.

पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेचे जगभरात 1,300 पेक्षा जास्त हिंदू मंदिरे आहेत. लंडन, शिकागो, टोरंटो, नैरोबीसह जगभरातील प्रमुख शहरात मंदिरे आहेत. कॅलिफोर्नियातील चिनो हिल्सजवळील मंदिराचे उद्घाटन २०१२ मध्ये झाले होते.

Another attack on a Hindu temple in America

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023