विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून गद्दार या गाण्यांनंतर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने आणखी एक गाणे हम होंगे कंगाल म्हटले आहे. या गाण्यातून त्याने स्टुडिओच्या तोडफोडीचा निषेध केला आहे. Kunal Kamra
हम होंगे कंगाल…’ हे गाणं त्याने गायलेलं जुनं गाणं आहे. या गाण्याच्या माध्यमातून त्याने पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. बेरोजगारी आणि महागाई या सर्व मुद्द्यावंरून हे गाणे बनवले होते. पण आता ते गाणे पुन्हा व्हायरल होत आहे एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर त्याचा शो जिथे झाला त्या हॅबिटॅट क्लबची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर हे गाणे आता त्याच्यासाठी खरं ठरलं असं म्हणतं त्याचा हा गाण्याचा व्हिडीओ त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणार असल्याचं दर्शवत पुन्हा एकदा व्हायरल करण्यात आला आहे.
विकसित भारताचं आणखी एक राष्ट्रगीत असल्याचं म्हणत हम होंगे कामयाब या गाण्याच्या धर्तीवर त्याने हम होंगे कंगाल हे गाणं रचलं. हे गाण्याच्या व्हिडिओमध्ये काल दिवसभरात जो गोंधळ झाला त्याच्या क्लिप्सही टाकल्या आहेत.
या व्हिडिओमध्ये एका बाजूला कुणाल कामरा ‘हम होंगे कंगाल’ गात आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटाने त्याच्या स्टुडिओची केलेल्या तोडफोडीची दृश्ये दिसत आहेत. ‘हम होंगे कंगाल एक दिन, मन में है अंधविश्वास, देश का सत्यानाश’ असे गाण्याचे शब्द आहेत.
कुणाल कामराने ज्या ठिकाणी त्याचा कार्यक्रम घेतला होता त्या ‘दी हॅबिटॅट’ स्टुडिओची शिवसेनेच्या (शिंदे) कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. त्यावर करताना कुणालने म्हटलं आहे की मी आता मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिजवर (प्रभादेवी) पुढचा शो आयोजित करणार आहे.माझ्या पुढच्या कार्यक्रमाचं ठिकाण असं असेल जे पाडण्याची अधिक गरज आहे. मी एल्फिन्स्टन ब्रिज किंवा मुंबईतील अशा इमारतीची निवड करेन जी पाडण्याची गरज आहे.
कुणाल कामराविरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ३५३ (१) ब, ३५३ (२) आणि ३५६ (२) बदनामी या कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्यात कुणाल कामराविरोधात पहिली पोलीस तक्रार दाखल झाली. त्यानंतर हा गुन्हा झीरो एफआयआर म्हणून खार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
या सगळ्या प्रकारानंतर कुणाल कामरा याने देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘माय स्टेटमेंट’ असं कॅप्शन देत त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये कुणाल कामराने म्हटलं आहे की “ज्या ठिकाणी माझा शो आयोजित करण्यात आला होता, ती अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठीची जागा आहे.
Another song by Kunal Kamra… Hum Honge Kangal
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप