Atul Kulkarni : काश्मीरमधून अतुल कुलकर्णींचा संदेश, मत आवडलं असेल तर अंमलबजावणी करा, नाही तर विसरून जा…

Atul Kulkarni : काश्मीरमधून अतुल कुलकर्णींचा संदेश, मत आवडलं असेल तर अंमलबजावणी करा, नाही तर विसरून जा…

Atul Kulkarni

विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : Atul Kulkarni  मी माझं म्हणणं मांडलं आहे. माझं मत आवडलं असेल तर त्यावर अंमलबजावणी करा. नाही आवडलं असेल तर विसरून जा. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ जणांना माझ्याकडून मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या हल्ल्याच्या वेदना झेलणाऱ्या अगणित लोकांप्रति संवेदना व्यक्त करतो, असे ज्येष्ठ अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी म्हटले आहे.Atul Kulkarni

काश्मीरमधील श्रीनगर येथील लाल चौकातून या विषयावरील ही माझी शेवटची पोस्ट असे म्हणत अतुल कुलकर्णी यांनी ही पाेस्ट केली आहे. 22 एप्रिल राेजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यासाठी स्थानिक काश्मिरींनाही दोषी ठरवत काश्मिरमधील पर्यटनावर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं होतं. या पार्श्वभूमीवर अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी अत्यंत संवेदनशील परिस्थितीतही काश्मीरमधील पहलगाम येथे जात भारतीय हे काश्मिरींसोबत आहेत, असा संदेश दिला होता.

या दौऱ्यादरम्यान आता श्रीनगरमधील लाल चौकातून अतुल कुलकर्णी यांनी देशवासियांना देशवासियांना संदेश देताना म्हटले आहे की, माझं मत आवडलं असेल तर त्यावर अंमलबजावणी करा. नाही आवडलं असेल तर विसरून जा. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ जणांना माझ्याकडून मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच या हल्ल्याच्या वेदना झेलणाऱ्या अगणित लोकांप्रति संवेदना व्यक्त करतो. काश्मीरमधील श्रीनगर येथील लाल चौकातून या विषयावरील ही माझी शेवटची पोस्ट.

पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर अभिनेते अतुल कुलकर्णी काश्मिरच्या दौऱ्यावर गेले आहेत. जास्तीत जास्त लोकांनी पहलगाम, काश्मीरला यावं, असं आवाहन त्यांनी केलं. आपण फक्त सोशल मीडियावर याविषयी लिहितो. कुठेतरी काहीतरी बोलतो. पण यासाठी मी काय कृती करु शकतो. माझ्या वाचण्यात आलं की इथे येण्यासाठीचं ९० % बूकींग रद्द झालं. सध्या हा पर्यटनाचा चांगला काळ आहे. काश्मीरमधील जे लोक आहेत त्यांना आपल्याला सांभाळायचं आहे. पर्यटनाचं फक्त पैशांपुरतं महत्व नाही. पर्यटनात लोक एकमेकांशी जोडले जातात, असे त्यांनी इथे आल्यावर आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले होते.

Atul Kulkarni’s message from Kashmir, if you like the opinion, implement it, if not, forget it…

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023