विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Nitin Gadkari चांगली सेवा पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला पैसे तर मोजावेच लागणार आहेत. पुढील आठवड्यात मी टोल संदर्भांत मोठी घोषणा करणार आहे, यामुळे लोकांची टोल संदर्भात जी काही नाराजी आहे, ती सर्व दूर होईल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.Nitin Gadkari
टीव्ही 9 या वृत्तवाहिनीच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, येत्या काळात आपले रस्ते हे अमेरिकेपेक्षाही चांगले असतील. चांगली सेवा पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला पैसे तर मोजावेच लागणार आहेत. पुढील आठवड्यात मी टोल संदर्भांत मोठी घोषणा करणार आहे,
टोलचा जनकच मी आहे. महाराष्ट्रात मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा मी मुंबई-पुणे हाय वे वर 55 फ्लायओवर्स बनवले होते. वांद्रा -वरळी सीलिंक प्रोजेक्ट बनवला. यासाठी मी मार्केटमधून पैसे उभारला. दोन दिवसांपूर्वीच मी संसदेमध्ये सांगितलं आहे की मी येत्या दोन वर्षांमध्ये तब्बल 25 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बनवणार आहे. ज्याचं बेजट दहा लाख कोटी रुपये इतकं असेल.
आम्ही मार्केटमधून पैसे उभारला त्यासाठी आम्ही कॅपिटल मार्केटच्या इनविट मॉडलचा वापर केला. आमच्याकडे सात दिवसांचा वेळ होता. पण एक दिवस आणि सात तासांमध्येच कॅपिटल जमा झालं. सध्या शंभर रुपयांचा शेअर 140 रुपयांवर पोहोचला आहे. मी जर कर्ज घेतलं तर ते वापस पण करावंच लागणार आहेना, आज भारतामध्ये वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे, ट्राफिक जाम होत आहे. तुम्ही म्हणाल रस्ते चांगले तयार करा, उड्डाणपूल तयार करा तर त्यासाठी भांडवल तर लागणारच आहे ना? त्यासाठी पैसे कुठून आणणार?
Big announcement regarding toll next week, Nitin Gadkari’s information
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
- Kunal Kamra कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकेपासून संरक्षण
- Anna Bansode : विधानसभा उपाध्यक्षपदी निवड अन् दोन दिवसात अण्णा बनसोडेंना उच्च न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश
- Prashant Koratkar प्रशांत कोरटकर यांच्यावर न्यायालयातच वकिलाचा हल्ला