Alka Lamba ग्रेसची आप विरोधात मोठी खेळी, मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात अलका लाम्बा

Alka Lamba ग्रेसची आप विरोधात मोठी खेळी, मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात अलका लाम्बा

Alka Lamba

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने ३ जानेवारी रोजी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. काँग्रेसतर्फे कालकाजी विधानसभा मतदारसंघातून अलका लाम्बा या निवडणूक लढवणार आहेत.

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने अलका लाम्बा यांची उमेदवारी मंजूर केल्याचे एआयसीसीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी जाहीर केले.


Devendra Fadnavis महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या यादीत पहिल्या दहा मध्ये ही नाहीत!


अलका लाम्बा या सध्या अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. त्या चांदणी चौक मतदारसंघातील माजी आमदार आहेत. अलका लाम्बा या दीर्घकाळ काँग्रेस पक्षाशी जोडलेल्या होत्या, मात्र २०१४ साली त्यांनी पक्ष सोडून आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. आपच्या तिकिटावर निवडणूक लढवत त्यांनी चांदणी चौक मतदारसंघातून विजय मिळवला होता.

मात्र, आपच्या नेतृत्वासोबतच्या नाराजीनंतर त्यांनी २०१९ साली काँग्रेसमध्ये पुनरागमन केले. यानंतर त्यांना पक्षांतरविरोधी कायद्याअंतर्गत आमदारकीसाठी अपात्र ठरवण्यात आले.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये होणार असून, निवडणूक आयोग लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे.

Big move of Congress against AAP, Alka Lamba against Chief Minister Atishi

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023