विशेष प्रतिनिधी
दावणगेरे : वक्फ दुरुस्ती विधेयक कायद्यात (Waqf Amendment Bill) रूपांतर झाल्यानंतरही देशभरात त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर कर्नाटकातील दावणगेरे येथील काँग्रेस नेते आणि माजी नगरसेवक कबीर खान यांनी आंदोलनकर्त्यांना थेट हिंसक मार्ग अवलंबण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
एका व्हिडीओमध्ये कबीर खान तरुणांना उद्देशून म्हणताना दिसतात, “पोस्टर धरून, निवेदन देऊन काही होणार नाही. रस्त्यावर उतरा. जे करायचं आहे ते करा. बस, ट्रेन जाळा. जाळा, मरा, बलिदान द्या. प्रत्येक गावातून ८-१० लोक मरायला हवेत. ५०-१०० गुन्हे दाखल व्हायला हवेत. एवढ्या सोप्या पद्धतीने हे विधेयक मागे जाणार नाही. त्यासाठी मोठं बलिदान द्यावं लागेल.”
या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून, अनेकांनी त्यांच्या वक्तव्यावर कारवाईची मागणी केली आहे. सार्वजनिक शांतता भंग करणारे आणि कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारे असे विधान केल्यामुळे कबीर खान यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वाढत आहे.
Burn buses, trains…8-10 people should die in every village,” Congress leader’s inflammatory statement on Waqf Amendment Bill
महत्वाच्या बातम्या