लडाख मध्ये पॅनोंग त्सो किनाऱ्यावर चिनी सीमेला भिडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण!!

लडाख मध्ये पॅनोंग त्सो किनाऱ्यावर चिनी सीमेला भिडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लडाख मध्ये जिथे भारतीय सैन्याचा चिनी सैन्याशी संघर्ष झाला त्या पॅनोंग त्सो अर्थात पॅनोंग तलावाजवळ भारतीय लष्कराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे. जम्मू काश्मीरमध्ये लष्करी मुख्यालयात तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आधीच उभारण्यात आला आहे त्यापाठोपाठाचा लडाखमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भारतीय सैन्याला प्रेरणा देणार आहे.

पेनॉंग त्सो लडाख मध्ये तब्बल 14300 फुटांवर आहे. याच परिसरामध्ये चिनी सैन्याने घुसखोरी करायचा प्रयत्न केला होता, तो भारतीय सैन्य दलाच्या शूर जवानांनी हाणून पाडला होता. या पॅनोंग त्सो तलावाच्या किनाऱ्यावर भारतीय लष्कराने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे.

या पुतळ्याचे अनावरण मराठा लाईट इन्फंट्रीच्या फायर अँड फ्युरीचे लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लडाखची ती युद्धभूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने दुमदुमली. यावेळी जवानांनी प्रचंड उत्साहात पोवाडे आणि शौर्य गीते सादर केली.

Chhatrapati Shivaji Maharaj was inaugurated on the banks of Pangong Tso

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023