विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त हाेत आहे. जगभरातून या हल्ल्याचा निषेध होत असताना जम्मू काश्मीरचे लोकही रस्त्यावर उतरले आहेत. तेथील नागरिक या हल्ल्याचा निषेध करत आहेत.
पहलगाम येथील हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर भागातील काही व्हिडीओ समोर येत आहेत. या व्हिडीओंमध्ये तेथील नागरिक या हल्ल्याचा निषेध करताना दिसत आहेत. काही ठिकाणी तर लोकांनी कँडल मार्च काढून हल्ल्याच्या निषेध केला असून मृतांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. आम्हाला हा हिंसाचार नको आहे. आम्हाला आमच्या काश्मीरचे पावित्र्य असेच ठेवायचे आहे, असे म्हणत तेथील नागरिकांकडून दहशतवादी हल्ल्यांना विरोध करत आहेत.
या हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटन धोक्यात येईल, अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पर्यटक आमच्यासाठी देवाच्या ठिकाणी आहेत, आम्ही त्यांची काळजी घेणार आहोत, असेही मत तेथील नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. अशाच प्रकारचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक मराठी भाषेत बोलणारी मुलगी दिसत आहे. या मुलीच्या मागे काही काश्मीरमधील नागरिक दिसत आहे. हे नागरिक काश्मीरमधील हिंसाचार थांबवा अशी मागणी करताना दिसत आहेत.
रस्त्यावर उतरून बंधूभाव, भारताचं अखंडत्व कायम राहावं, अशी भावना या नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. पहलगाममधील हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील नागरिक पहिल्यांदाच रस्त्यावर आले असून हिंसेला विरोध करत आहेत. काश्मीरच्या परिसरात शांतता हवी आहे, असा निश्चय घेऊन नागरिक बाहेर पडत आहेत. त्यामुळे भविष्यात येथील पर्यटन सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Citizens of Kashmir take to the streets against terrorism
महत्वाच्या बातम्या
- लग्नानंतर सात दिवसांनी हनिमूनसाठी गेलेल्या भारतीय नाैदलातील अधिकाऱ्याचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू
- मेळघाटातील कुपाेषणावर काय उपाययाेजना केल्या? काॅंग्रेसच्या नेत्या यशाेमती ठाकूर यांचा सवाल
- Ashish Shelar : उद्धव ठाकरे हे मुंबईतील भूखंड घोटाळ्याचे बादशहा, आशिष शेलार यांचा आरोप
- UPSC 2024 निकाल जाहीर, शक्ती दुबे देशात अव्वल, पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा ; महाराष्ट्राची कामगिरी उजळली