Congress : काँग्रेसकडून केवळ व्होटबँकेसाठी वक्फ कायद्यात बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

Congress : काँग्रेसकडून केवळ व्होटबँकेसाठी वक्फ कायद्यात बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी

हिसार : काँग्रेसने केवळ व्होटबँकेसाठी वक्फ कायद्यात बदल केले. हा कायदा केवळ काही कट्टरपंथीयांना खूश करण्यासाठी वापरण्यात आला. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या सर्वसामान्य घटकाचे प्रचंड नुकसान झाले, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील हिसार येथे झालेल्या जाहीर सभेत काँग्रेसवर केला.

वक्फ कायदा आणि त्याच्या नावाखाली काँग्रेसने केलेल्या राजकारणावर ताशेरे ओढताना पंतप्रधान म्हणाले, देशभरात वक्फ बोर्डाच्या नावावर लाखो हेक्टर जमीन आहे. “ही जमीन गरीब, गरजू महिलां आणि मुलांसाठी वापरली जावी, ही मूळ संकल्पना होती. पण काँग्रेसने या जमिनीचा उपयोग आपल्या राजकीय फायद्यासाठी केला. जर ही संपत्ती योग्य हेतूने वापरली गेली असती, तर आज अनेक मुस्लिम तरुणांना सायकलचे पंक्चर दुरुस्त करत आपले आयुष्य कंठावे लागले नसते.



२०१३ मध्ये काँग्रेसने वक्फ कायद्यात केलेल्या सुधारणा ही ‘मतपेढी जिंकण्याची घाईगडबड’ असल्याचा आरोप करताना मोदी म्हणाले, २०१३ च्या शेवटच्या अधिवेशनात काँग्रेसने घाईघाईने वक्फ कायद्यात बदल केले, जेणेकरून काही विशिष्ट वर्गाचे मते मिळतील. हा कायदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या मुल्यांचाच अपमान आहे.

मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या तुष्टीकरण धोरणामुळे मुस्लिम समाज शिक्षण, नोकरी आणि विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिला. “काँग्रेसने केवळ धर्माच्या नावाने कट्टरपंथीयांचा लाभ पाहिला. उर्वरित मुस्लिम समाज दयनीय, अशिक्षित आणि गरीब राहिला,” असे ते म्हणाले.

“काँग्रेसला जर मुस्लिम समाजाबद्दल खरी सहानुभूती असेल, तर त्यांनी एखाद्या मुस्लिमाला पक्षाध्यक्ष का बनवले नाही? उमेदवारी देत असाल, तर ५०% मुस्लिमांना द्या. पण सत्य हेच आहे की काँग्रेसकडे देण्यासारखे काहीही नाही. त्यांचा हेतू केवळ देशातील नागरिकांचे हक्क हिसकावून घेण्याचा आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Congress changes Waqf law only for vote bank, PM Narendra Modi attacks

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023