विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Prime Minister टीका ही “लोकशाहीचाआत्मा” आहे आणि ती स्वागतार्ह असते. मात्र, खरी, अभ्यासपूर्ण आणि तीव्र टीका आजकाल दुर्मीळ होत चालली आहे अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली .Prime Minister
अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ आणि पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाले असता ते म्हणाले, मी टीकेचे स्वागत करतो. जर खऱ्या अर्थाने लोकशाही तुमच्या रक्तात असेल, तर तुम्ही टीकेला स्वीकारायलाच हवे. आपल्या शास्त्रांमध्ये म्हटले आहे की टीकाकारांना जवळ ठेवा. कारण खरी, अभ्यासपूर्ण टीका तुमचे दोष दाखवते आणि तुम्हाला सुधारण्याची संधी मिळते.”
मात्र, आजकाल खरी टीका आढळत नाही अशी खंत व्यक्त करून मोदी म्हणाले, गंभीर आणि माहितीपूर्ण टीकेचा अभाव आहे. आज लोक संशोधनाला महत्त्व देत नाहीत, खऱ्या त्रुटी ओळखण्याऐवजी सरळ आरोप करतात,”
लोकशाही मजबूत राहण्यासाठी खऱ्या टीकेची गरज असल्याचे सांगताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आरोप केल्याने कुणाचाही फायदा होत नाही; उलट त्यामुळे समाजात अनावश्यक तणाव निर्माण होतो. म्हणून मी नेहमी टीकेचे स्वागत करतो. मात्र, जेव्हा खोटे आरोप होतात, तेव्हा मी शांतपणे देशसेवेतच स्वतःला झोकून देतो.
Criticism is the soul of democracy, but the Prime Minister said it should be scholarly.
महत्वाच्या बातम्या
- Anjali Damania : हे सर्व जण तुमच्याच तालमीत तयार, तुम्हीच मोठे केलेत, अंजली दमानिया यांनी शरद पवारांना सुनावले
- Harshvardhan Sapkal सत्ताधारी पक्षातील लोकांकडून दहशत, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे, महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयकावरून जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
- Devendra Fadanvis : बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्ताराचा निर्णय!