विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जाहीर केली आहे. ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे तर ८ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे.
दिल्लीमध्ये ७० विधानसभेच्या जागा आहेत. १.५ कोटी हून अधिक उमेदवार दिल्लीत आहेत. २.०८ लाख मतदार असे आहेत जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत. एका टप्प्यात दिल्लीची निवडणूक होणार आहे. ५ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी मतदान होणार तर ८ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली. दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २३ फेब्रुवारीला संपतो आहे.
नव्या वर्षात दिल्लीत निवडणूक होते आहे. दिल्लीत देशाचं चित्र एकवटलेलं पाहण्यास मिळते. प्रत्येक संस्कृतीचं दर्शन या ठिकाणी होतं. दिल्लीकर यावेळी उत्तम प्रकारे मतदान करतील अशी आशा आहे असे, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले.
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावेळीही नवी दिल्लीतून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यांचा सामना काँग्रेसचे संदीप दीक्षित आणि भाजपच्या प्रवेश वर्मा यांच्याशी आहे. केजरीवाल मागच्या दोन निवडणुकीत इथूनच जिंकून विधानसभेत आले. नवी
मुख्यमंत्री आतिशी कालकाजीमधून विधानसभा निवडणूक लढवत आहे. त्यांचा सामना काँग्रेसच्या अलका लांबा आणि दक्षिण दिल्लीचे माजी भाजप खासदार रमेश बिधूडी यांच्याशी आहे
आप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष लोकसभा निवडणूक एकत्र लढले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगळे झाल्याचं दिसून येतं आहे. अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांचा उल्लेख देशद्रोही असा केला होता. त्यानंतर या प्रकरणावरुन दिल्लीचं राजकारण तापलेलं पाहण्यास मिळालं. दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांच्या शीशमहल या घरावरुन मोदी आणि अमित शाह हे सातत्याने केजरीवालांवर टीका कत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार? हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असणार आहे
दिल्ली विधानसभेची निवडणूक आप या पक्षाने सलग दोनवेळा जिंकली आहे. भाजपाला ‘दिल्ली’ काबीज करायची आहे. त्यामुळे भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात तुरुंगात जावं लागल्याने त्यांनी आता लोक निवडून देतील तेव्हाच मी मुख्यमंत्री होईन असं म्हणत आतिशी यांना ते पद दिलं. या दरम्यान काँग्रेस आणि आप बरोबर आहेत असं वाटत असतानाच अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही म्हटलं.
Delhi assembly election date announced, voting on 5th February
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली