विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : निवडणुकीत आश्वासने देताना बोलण्याच्या भारत जीभ घासरते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या एका उमेदवाराची जीभ अशीच घसरली. मी निवडून आलो तर प्रियांका गांधींच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते बनवेन असे भाजपा उमेदवार रमेश बिधुरी बोलून बसले.
बिधुरी हे कालकाजी या हाय प्रोफाईल मतदारसंघातून लढत आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि काँग्रेसच्या अलका लांबा यांच्याशी त्यांचा सामना आहे. रमेश बिधुरी यांच्या वादग्रस्त टिप्पणीवर काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे.
भाजपाला महिलाविरोधी पक्ष संबोधून काँग्रेसने म्हटलंय की बिधुरी यांनी केलेलं वक्तव्य लज्जास्पद आहे. महिलांच्या बाबतीत त्यांची कुरूप मानसिकता दिसते. हाच भाजपाचा खरा चेहरा आहे, असे काँगेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते म्हणाल्या. त्यांनी रमेश बिधुरी आणि संपूर्ण भाजपाने प्रियांका गांधींची माफी मागावी, अशीही मागणी केली आहे.
ये है BJP का प्रत्याशी इसकी भाषा सुनिए ये है BJP का महिला सम्मान।
क्या ऐसे नेताओं के हाथ में दिल्ली की महिलाओं का सम्मान सुरक्षित है? pic.twitter.com/sLKSBjSbQi— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) January 5, 2025
मात्र यावर रमेश बिधुरी म्ङणाले, आज जर या विधानाने काँग्रेसची मने दुखावली असतील तर हेमा मालिनी यांचं काय? त्या एक प्रसिद्ध नायिका राहिल्या आहेत. त्यांनी भारतीय चित्रपटांनी भारताचा गौरव केला आहे. परंतु, लालूप्रसाद यादव यांनी बिहारचे रस्ते हेमा मालिनी यांच्या गालासारखे गुळगुळीत करू असं म्हटलं होतं. जर लालूंचे विधान चुकीचे असेल तर माझेही विधान चुकीचे असेल.
बिधुरी यांच्या या वक्तव्यावर आम आदमी पक्षाकडून राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनीही ट्वीट केलंय. ते म्हणाले, हा भाजपाचा उमेदवार आहे. त्यांची भाषा ऐका. हा भाजपाच्या महिलांचा सन्मान आहे. अशा नेत्यांच्या हातात दिल्लीतील महिलांचा सन्मान सुरक्षित राहील का?
Delhi’s BJP candidate said like Priyanka Gandhi’s cheek
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली