विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Nishikant Dubey १९५४ मध्ये संसदेच्या सदस्यांनी विधेयकाला विरोध करूनही, पक्षाने मुस्लिमांना खुश करण्यासाठी वक्फ कायदा मंजूर केला. वक्फला दुसऱ्या कोणत्याही देशात असे अधिकार देण्यात आले नाहीत, तुम्हाला भारताला मुस्लिम राष्ट्र बनवायचे आहे का?”, असा थेट सवाल भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी विराेधकांना केला आहे.Nishikant Dubey
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आज केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फ दुरूस्ती विधेयक सादर केले. यानंतर दुपारपासून या विधेयकावर सभागृहात चर्चा सुरू आहे. दरम्यान सत्ताधारी मंत्री आणि खासदारांनी या विधेयकाच्या बाजून मते व्यक्त केली आहेत. तर, विरोधी पक्षांच्या खासदारांनी याला विरोध केला आहे.
झारखंडमधील गोड्डा लोकसभा मतदारसंघाचे खासदार निशिकांत दुबे यांनी वक्फ विधेयकावरील चर्चेत, वक्फ बोर्डात गैर-मुस्लिमांचा समावेश का असावा असा प्रश्न करणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांना लक्ष्य केले. दुबे यांनी असा प्रश्न केला की, जर गैर-मुस्लिम लोक वक्फ बोर्डाला मोठे दान करू शकतात, मक त्यांच्यापैकी कोणी बोर्डात का असू शकत नाही?भारतात मुहम्मद घोरी यांनी वक्फ सुरू केले. जिन्नांनी पाकिस्तानची निर्मिती केली आणि आज पुन्हा एकदा वक्फच्या नावाखाली समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहेत.”
दुसरीकडे या विधेयकाला विरोधी पक्षांनी कडकडून विरोध केला आहे. यामध्ये काँग्रेस खासदार गौरव गौगोई, शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार अरविंद सावंत, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सभागृहातून याला विरोध केला.
जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी सभागृहाबाहेरून यावर टीका केली. त्या म्हणाल्या “ते (भाजपा) विसरले आहेत की, आज त्यांचे सरकार आहे पण उद्या त्यांचे सरकार राहणार नाही. ते जाईपर्यंत संपूर्ण देश उद्ध्वस्त झालेला असेल. सध्या सत्तेत असलेले सरकार मुस्लिमांच्या हक्कांचे उल्लंघन करत आहे. येत्या काळात संपूर्ण देशाला याचे परिणाम भोगावे लागतील.”
Do you want to make India a Muslim nation?” Nishikant Dubey’s direct question to Congress
महत्वाच्या बातम्या
- Chief Minister : वैदिक गणितावर आधारित गुणवत्ता केंद्र सुरू करणार , मुख्यमंत्र्यांची माहिती
- Maharashtra भाऊसाहेबांकडचे हेलपाटे वाचले, महाराष्ट्रातील शेतकरी हायटेक झाले, शासनाला ७६ कोटी ८० लाख
- Ashish Shelar लागली बत्ती पार्श्वभागाला की.. आशिष शेलार यांच्यावर टीकेवरून संदीप देशपांडे यांना इशारा
- Kunal Kamra मुंबईत येईल तेव्हा शिवसेना स्टाईलने स्वागत करू…राहुल कनाल यांचा कुणाल कामराला इशारा