विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Amit Shah अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचून दाखवत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लबाडपणा कसा.करायचा ते केजरीवाल यांच्याकडून शिका असा हल्लाबोल केला.Amit Shah
दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपचे ठराव पत्र ३.० जारी केले आहे. यावेळी ते म्हणाले , ठराव हा एक विश्वास आहे. आमची पोकळ आश्वासने नाहीत. १ लाख ८ हजार लोक आणि ६ हजार गटांच्या सूचनांवर हे ठराव पत्र तयार करण्यात आले. अरविंद केजरीवाल हे खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडतात. नंतर आपण निष्पाप असल्याचे दाखवत जनतेसमोर मतांसाठी जातात. .
अमित शाह यांनी अरविंद केजरीवाल यांना शीशमहालवरून टोकले आहे.ते म्हणतात की, केजरीवाल म्हणाले होते की, कोणताही मंत्री हा सरकारी बंगला घेणार नाही. मात्र त्यांनी बंगलाही घेतला आणि आपला शीशमहलही बांधला आहे. सध्या ते करोडो रुपयांच्या बंगल्यात वास्तव्य करत आहेत. यामुळे आता दिल्लीकर त्यांना जाब विचारत आहेत. त्यांनी यमुना शुद्ध करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यात त्यांनी दिल्लीकरांना डुबकी मारण्यास सांगितली होती. त्यामुळे आता दिल्लीकर डुबकी मारण्याची वाट पाहत आहेत. जर तुम्हाला डुबकी मारता येत नसेल तर कुंभामध्ये स्नान करा, असे म्हणत त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
दिल्लीतील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कमी होणाऱ्या संख्यांवर अमित शहा म्हणाले, दिल्लीत असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत आहे. त्यांना आता खासगी शाळांमध्ये जावे लागत आहे. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी भ्रष्टाचार केला आहे. दिल्लीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. त्याची पातळी आता केजरीवाल यांनीच वाढवली आहे.
अमित शाह म्हणाले की, केजरीवाल यांनी एवढ्या जाहीराती देण्याचे काम केले आहे की, दिल्लीमध्ये झालेला कचरा उचलण्यास आता पैसे शिल्लक राहिले नाहीत. आता त्यांनी निवडणुका लक्षात घेता खोटे बोलत लबाडपणा करू लागले आहेत. भाजपप्रती दिल्लीमध्ये अपप्रचार करू लागले आहेत. यामुळे आता ढोंगी आणि लबाडपणाचे राजकारण बंद झाले पाहिजे. सर्वजण आश्वासनांचा पाऊस पाडतील. मात्र आश्वासने मोदी सरकारच पूर्ण करू शकतील. त्यांनी भ्रष्टाचार आणि प्रदूषण मुक्त होण्यास सांगितले होते. मात्र आता तेच भ्रष्टाचाराच्या आरोपांवर तुरुंगात गेले होते, असे म्हणत अमित शाह यांनी केजरीवाल यांच्या वर टीका केली
Learn lies from Kejriwal, Amit Shah’s attack on corruption
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणाच्या पलीकडचे, वाद लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उदय सामंत यांनी सुनावले
- Prime Minister : पंतप्रधानांची ‘मन की बात’, वाशीमचे ‘स्टार्ट अप’चे केंद्र म्हणून कौतुक
- Gulabrao Patil : झोपेत असाल त्यावेळी ठाकरे गटाचे १० आमदार कधीही इकडे येतील, गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरे यांना इशारा
- Rohit Pawar : रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाचे डोहाळे, म्हणाले शरद पवार भाकरी फिरविणार