विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Rahul Gandhi डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींच्या भ्रमाचा भोपळा फोडला आहे. आता आपल्याला सत्याचा सामना करावा लागेल, असा हल्लाबाेल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर केला आहे.Rahul Gandhi
भारतीय शेअर बाजाराची होत असलेली घसरण आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं आयात शुल्क (टॅरिफ) धोरण चर्चेत आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारतीय शेअर बाजारावर मोठा परिणाम झाला असून कोट्यवधी भारतीयांना त्याचा फटका बसला आहे.
राहुल गांधी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणाचा हवाला देत राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की “ट्रम्प यांनी मोदींच्या भ्रमाचा भोपळा फोडला आहे. आता आपल्याला वास्तविकतेचा सामना करावा लागेल. या परिस्थितीत पंतप्रधान मोदी आपल्याला कुठेच दिसत नाहीयेत. भारताकडे आपल्या आर्थिक भविष्यासाठी केवळ एक लवचिक व उत्पादन-आधारित अर्थव्यवस्था उभारण्याचा पर्याय आहे, जी सर्व भारतीयांसाठी लाभदायी ठरेल.
पाटण्यात आयोजित संविधान संरक्षण संमेलनात राहुल गांधी म्हणाले, “अमेरिकेच्या अध्यक्षांनी उचललेल्या पावलांमुळे भारतीय शेअर बाजार गडगडला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांनी भारताचा शेअर बाजार हादरवला आहे. भारतातील एक टक्क्याहून कमी लोक शेअर बाजारात गुंतवणूक करतात. याचाच अर्थ असा की शेअर बाजार सामान्य जनतेसाठी नाही. मात्र, काही लोक इथे मोजता येणार नाहीत इतके पैसे कमावतात. मात्र, सामान्य माणसाला याचा काय फायदा होतो? काहीच नाही.”
Donald Trump burst the pumpkin of Modi’s delusion, Rahul Gandhi attacked
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis जीडीपी 300 बिलियन डॉलर पर्यंत नेण्यासाठी एमएमआर ग्रोथ हब महत्त्वाचे, प्रकल्पांची कामे वेगाने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
- Harshvardhan Sapkal : सरकारने इंधनावर लावलेले कर आणि सेस यासंदर्भात श्वेतपत्रिका काढावी, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- Supriya Sule : महिलेचा मृत्यू नसून हत्या, डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा, सुप्रिया सुळे यांची मागणी
- Dr. Sushrut Ghaisas तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा