Arjun Meghwal डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने वारंवार अपमान केला, अर्जुन मेघवाल यांचा आराेप

Arjun Meghwal डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने वारंवार अपमान केला, अर्जुन मेघवाल यांचा आराेप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने वारंवार अपमान केला. तर भारतीय जनता पक्षाने अनेक कृतींमधून बाबासाहेबांचा सन्मान राखला, असे प्रतिपादन केंद्रीय विधी आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी शुक्रवारी येथे केले. बाबासाहेब, संविधान आणि भाजपबाबत पसरवलेल्या खोट्या नरेटिव्हला छेद देत कार्यकर्त्यांनी सर्वांपर्यंत सत्य पोहोचवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने शुक्रवारी प्रदेश कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘सन्मान अभियान’ कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी मेघवाल यांनी काँग्रेसवर टीका केली.

भारतरत्न सन्मान, संविधान गौरव यात्रा, पंचतीर्थ तसेच दीक्षाभूमी विकास, सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेबांचे तैलचित्र लावणे यांसह अनेक कृतींतून भाजपने बाबासाहेबांप्रति असलेला आदर दर्शवला आहे. काँग्रेसने कायम बाबासाहेबांचा द्वेष केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव करण्यापासून ते संविधान सभेत काम करताना काँग्रेसने बाबासाहेबांना राज्यघटनेत समस्त मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी, सर्वांगीण विकासासाठी हव्या तशा तरतुदी करू दिल्या नाहीत, असा आरोपही त्यांनी काँग्रेसवर केला.

संविधानाची निर्मिती करून बाबासाहेबांनी देशाचा सर्वांगीण विकास आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीचा मार्ग घालून दिला. बाबासाहेबांचे विचार पुढे नेत प्रत्येक घटकाचा विकास आणि सामाजिक सलोखा राखणे हे भाजपचे ध्येय आहे. आपला देश अखंड रहावा आणि जातीधर्मात फूट पडू नये यासाठी भाजप झटत असताना दुसरीकडे विरोधक मात्र देशाबाहेरील तसेच देशातील विघातक शक्तींना हाताशी धरून देशाच्या अखंडतेला बाधा पोहोचवत आहेत, असा आरोप भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केला. प्रत्येक कार्यकर्त्याने वाडीवस्तीपर्यंत जाऊन बाबासाहेबांचे विचार तसेच संविधानाप्रति भाजपची असलेली कटीबद्धता लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Dr. Congress repeatedly insulted Babasaheb Ambedkar, Arjun Meghwal accused

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023