विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Prime Minister Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्षमतेविषयी सर्वांनाच कुतूहल असते. मोदी यांनी लेक्स फ्रिडमॅनसोबत केलेल्या पॉडकास्टमध्ये त्याचे गुपित उलगडले आहे.Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आमच्याकडे चातुर्मासाची परंपरा आहे. जेव्हा वर्षा ऋतू होते, तेव्हा डायझेशन पॉवर कमी होते. वर्षा ऋतूत मी एक वेळा जेवतो. म्हणजे एक 24 तासात एक वेळ जेवतो. जूनपासून हे सुरू होतं. दिवाळी नंतर म्हणजे नोव्हेंबरपर्यंत मी एक वेळ जेवतो. म्हणजे साडेचार महिन्यात मी एक वेळ जेवतो. त्यानंतर नवरात्रीत दुर्जा पूजा असते. नऊ दिवसाचा हा उत्सव असतो. तेव्हा मी रोज गरम पाणी पितो. तसंही गरम पाणी पिण्याची माझी सवय आहे. मार्च एप्रिल महिन्यात नवरात्री येते. आमच्याकडे तिला चैत्री नवरात्री म्हणतात. यंदा 31 मार्चला सुरु होते. त्या नऊ दिवसात मी दिवसाला एक फळ खातो. फक्त एकच फळ खातो. म्हणजे एकदा पपई खाल्ली तर नऊ दिवस पपईच खातो. दुसरं फळ खात नाही. गेल्या 55 वर्षापासून मी हे करतोय, असंही मोदी म्हणाले.
ते म्हणाले, भारतात आमच्या धार्मिक परंपरा वास्तवात जीवन जगण्याची एक पद्धत आहे. आमच्या सर्वोच्च न्यायालयाने एकदा हिंदू धर्माची सुंदर व्याख्या केली होती. कोर्ट म्हणालं होतं की, हिंदू धर्म अनुष्ठान वा पूजा करण्याच्या पद्धतीसाठी नाही, तर हिंदू धर्म जीवन जगण्याची एक पद्धत आहे. एक दर्शन आहे, ते स्वत: मार्गदर्शन करतं. आणि आमच्या शास्त्रांमध्ये शरीर, मन, बुद्धी, आत्मा आणि मानवतेला उच्च स्तरावर नेण्याची गहन चर्चा आहे. ती मिळवण्यासाठी विविध मार्ग, परंपरा आणि प्रणालींची रुपरेषा तयार होते. उपवास त्यापैकीच एक आहे. पण उपवास म्हणजे सर्वकाही नाही. भारतात तुम्ही याला सांस्कृतिक अंगाने पाहा वा दार्शनिक अंगाने, कधी कधी मला असं वाटतं उपवास हे शिस्तबद्धता विकसित करण्याची एक पद्धती आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे किंवा भारताशी अपरिचित लोकांना सांगायचं म्हणजे उपवास एक आत आणि बाहेर दोन्हीमध्ये संतुलन साधण्याचं एक शक्तीशाली साधन आहे. जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा तो जीवनला अत्यंत गहनपणे आकार देते. तुम्ही पाहिलं असेल, जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही दोन दिवसापासून उपवास पकडला असून या काळात फक्त पाणी पीत आहात. तुमचे प्रत्येक इंद्रीय, खासकरून गंध, स्पर्श आणि स्वाद अत्यंत संवेदनशील होतात. तुम्हाला पाण्याच्या सुक्ष्म गंधाचीही जाणीव होते. कदाचित तुम्हाला ही जाणीव यापूर्वी कधी झाली नसेल. जेव्हा तुमच्या जवळून कोणी चहा घेऊन जात असेल तर तुम्हाला त्याचा गंध जाणवतो. कॉफीबाबत तेच होतं. एक छोटसं फूल तुम्ही यापूर्वी पाहिलं होतं. पण आज तुम्ही या फुलाला पुन्हा पाहिलं तर तुम्ही आज त्याला अधिक स्पष्टपणे पाहाल. निरखून पाहाल. कारण तुम्ही इंद्रीय अधिक तेज आणि जागरुक झालेली असतात. त्यामुळे कोणताही गोष्ट पाहण्याची क्षमता अनेकपटीने वाढलेली असते. मी वैयक्तिकरित्या नेहमीच हा अनुभव घेत असतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
उपवासाचे महत्त्व सांगताना मोदी म्हणाले, आणखी एका गोष्टीचा मी अनुभव केलाय. उपवासामुळे विचाराची प्रक्रिया अधिक तेज होऊ शकते. त्यामुळे एक नवा दृष्टीकोण मिळतो. तुम्ही चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करता. प्रत्येकाला हा अनुभव येतो की नाही मला माहीत नाही. पण मला निश्चितपणे हा अनुभव येतो. बहुतेकांना उपवासाचा अर्थ जेवण न करणं किंवा जेवण सोडणं असं वाटतं. पण हा उपवासाचा एक शारीरिक भाग आहे. एखाद्या अडचणीमुळे कुणाला रिकाम्यापोटी राहवं लागत असेल तर त्याला उपवास म्हणतात का? उपवास वास्तवात एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. मी जेव्हा दीर्घ उपवास करतो तेव्हा मी माझ्या शरीराला तयार करत असतो. उपवासाच्या पाच सात दिवस आधी, मी माझ्या सिस्टिमला आंतरिक रुपाने रिसेट करण्यासाठी आयुर्वेदिक अभ्यास आणि योग अभ्यासासोबतच अन्य पारंपारिक विधींचं पालन करत असतो. तेवढंच पाणी प्यावं
वास्तवात उपवास सुरु करण्यापूर्वी मी जेवढं आवश्यक आहे, तेवढं पाणी पीत असतो. त्यामुळेच ही विषहरण प्रक्रिया माझ्या शरीराला सर्वोत्तम शक्य पद्धतीने तयार करण्यास मदत करते. जेव्हा मी उपवास सुरू करतो, तेव्हा ते माझ्यासाठी भक्तीचं कार्य असतं. उपवास आत्म अनुशासनाचं रुप आहे. माझ्यासाठी व्यक्तिगत रित्या, जेव्हा मी उपवासा दरम्यान दैनिक गोष्टी करत असतो, तेव्हा माझं मन अत्यंत गहनपणे आत्मनिरीक्षण करू लागतं. आणि माझं मन आत केंद्रीत होतं. आणि हा अनुभव माझ्यासाठी अत्यंत परिवर्तन करणारा असतो. पुस्तके वाचून, धर्मोपदेश ऐकून किंवा कोणत्या परंपरेचं पालन म्हणून माझा उपवासा बाबतचा अभ्यास झालेला नाही. कारण माझ्या कुटुंबाने त्याचं पालन केलं आहे. हा माझ्या वैयक्तिक अनुभवातून आला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
फक्त एकच फळ खातो
भारतात आमच्या धार्मिक परंपरा वास्तवात जीवन जगण्याची एक पद्धत आहे. आमच्या सर्वोच्च न्यायालयाने एकदा हिंदू धर्माची सुंदर व्याख्या केली होती. कोर्ट म्हणालं होतं की, हिंदू धर्म अनुष्ठान वा पूजा करण्याच्या पद्धतीसाठी नाही, तर हिंदू धर्म जीवन जगण्याची एक पद्धत आहे. एक दर्शन आहे, ते स्वत: मार्गदर्शन करतं. आणि आमच्या शास्त्रांमध्ये शरीर, मन, बुद्धी, आत्मा आणि मानवतेला उच्च स्तरावर नेण्याची गहन चर्चा आहे. ती मिळवण्यासाठी विविध मार्ग, परंपरा आणि प्रणालींची रुपरेषा तयार होते. उपवास त्यापैकीच एक आहे. पण उपवास म्हणजे सर्वकाही नाही. भारतात तुम्ही याला सांस्कृतिक अंगाने पाहा वा दार्शनिक अंगाने, कधी कधी मला असं वाटतं उपवास हे शिस्तबद्धता विकसित करण्याची एक पद्धती आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे किंवा भारताशी अपरिचित लोकांना सांगायचं म्हणजे उपवास एक आत आणि बाहेर दोन्हीमध्ये संतुलन साधण्याचं एक शक्तीशाली साधन आहे. जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा तो जीवनला अत्यंत गहनपणे आकार देते. तुम्ही पाहिलं असेल, जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही दोन दिवसापासून उपवास पकडला असून या काळात फक्त पाणी पीत आहात. तुमचे प्रत्येक इंद्रीय, खासकरून गंध, स्पर्श आणि स्वाद अत्यंत संवेदनशील होतात. तुम्हाला पाण्याच्या सुक्ष्म गंधाचीही जाणीव होते. कदाचित तुम्हाला ही जाणीव यापूर्वी कधी झाली नसेल. जेव्हा तुमच्या जवळून कोणी चहा घेऊन जात असेल तर तुम्हाला त्याचा गंध जाणवतो. कॉफीबाबत तेच होतं. एक छोटसं फूल तुम्ही यापूर्वी पाहिलं होतं. पण आज तुम्ही या फुलाला पुन्हा पाहिलं तर तुम्ही आज त्याला अधिक स्पष्टपणे पाहाल. निरखून पाहाल. कारण तुम्ही इंद्रीय अधिक तेज आणि जागरुक झालेली असतात. त्यामुळे कोणताही गोष्ट पाहण्याची क्षमता अनेकपटीने वाढलेली असते. मी वैयक्तिकरित्या नेहमीच हा अनुभव घेत असतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
विचाराची प्रक्रिया तेज होते
आणखी एका गोष्टीचा मी अनुभव केलाय. उपवासामुळे विचाराची प्रक्रिया अधिक तेज होऊ शकते. त्यामुळे एक नवा दृष्टीकोण मिळतो. तुम्ही चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करता. प्रत्येकाला हा अनुभव येतो की नाही मला माहीत नाही. पण मला निश्चितपणे हा अनुभव येतो. बहुतेकांना उपवासाचा अर्थ जेवण न करणं किंवा जेवण सोडणं असं वाटतं. पण हा उपवासाचा एक शारीरिक भाग आहे. एखाद्या अडचणीमुळे कुणाला रिकाम्यापोटी राहवं लागत असेल तर त्याला उपवास म्हणतात का? उपवास वास्तवात एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. मी जेव्हा दीर्घ उपवास करतो तेव्हा मी माझ्या शरीराला तयार करत असतो. उपवासाच्या पाच सात दिवस आधी, मी माझ्या सिस्टिमला आंतरिक रुपाने रिसेट करण्यासाठी आयुर्वेदिक अभ्यास आणि योग अभ्यासासोबतच अन्य पारंपारिक विधींचं पालन करत असतो, असं मोदी यांनी सांगितलं.
For the last 55 years, only one fruit has been eaten during Navratri, one meal for four and a half months, the Prime Minister said about the importance of fasting
महत्वाच्या बातम्या
- Anjali Damania : हे सर्व जण तुमच्याच तालमीत तयार, तुम्हीच मोठे केलेत, अंजली दमानिया यांनी शरद पवारांना सुनावले
- Harshvardhan Sapkal सत्ताधारी पक्षातील लोकांकडून दहशत, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे, महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयकावरून जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
- Devendra Fadanvis : बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्ताराचा निर्णय!