विशेष प्रतिनिधी
मुंबई : Kedar Jadhav टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू केदार जाधवने राजकारणात एन्ट्री केली आहे. आज भाजपात प्रवेश करून त्याने नवीन इनिंग सुरू केली.Kedar Jadhav
मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केदार जाधव याने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. आहे.
केदार जाधवचे भापजात येणे हे आमच्यासाठी खूप आनंद देणार आहे, असे म्हणत बावनकुळे यांनी केदार जाधवचे स्वागत केले. ते म्हणाले, केदारचे प्रचंड फॅन फॉलोअर्स आहेत. तो चांगला खेळाडू आहेत. आता ते चांगले कार्यकर्ते होतील. कारण मोदी म्हणतात की, 1 लाख तरूण लोक राजकारणात यावेत. विविध क्षेत्रातील लोक राजकारणात आल्यास त्या त्या क्षेत्राचा विकास होईल म्हणून केदार जाधवने राजकारणात यावी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अपेक्षा होती.
भाजपात प्रवेश केल्यानंतर केदार जाधव म्हणाला, “२०१४ ला केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आले तेव्हापासून त्यांना देशातील नागरिकांकडून प्रेम मिळालं आहे. जनतेचे समर्थन मिळाले असून, त्या समर्थनाच्या जोरावर त्यांनी देशाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. गेल्या कित्येक वर्षांत कुठल्याही सरकारला जे जमलं नाही ते नरेंद्र मोदी यांनी गेल्या १० वर्षांत करून दाखवलं आहे.मोदीनी जसा देशाचा विकास केला तसाच देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा विकास केला आहे. त्यांनी देखील अनेक मोठी कामं केली आहेत. आतापर्यंतच्या कित्येक सरकारांना जमलं नाही ते केंद्रात नरेंद्र मोदी यांनी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं आहे.
केदार जाधवने गेल्या वर्षाच्या जून महिन्यात क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. 39 वर्षीय केदार जाधवने त्याचा शेवटचा सामने 2020 साली फेब्रुवारी महिन्यात न्यूझिलंडविरुद्ध खेळला होता.
केदार जाधवने 2014 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आपला पहिला एकदिवसीय सामना रांचीमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. त्याने एकूण 73 एकदिवसीय सामन्यांत 42.09 च्या सरासरीने एकूण 1389 धावा केल्या. केदार जाधवने एकदीवसीय सामन्यांत दोन शतकं तसेच सहा अर्धशतकं केलेली आहेत. विशेष म्हणजे केदार जाधवच्या नावावर एकूण 27 बळी आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये केदार जाधवने 123.23 च्या सरासरीने एकूण 58 धावा केलेल्या आहेत.
केदार जाधव हा मूळचा पुण्यातील आहे. महाराष्ट्राकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळल्यानंतर त्याची थेट भारतीय संघात निवड झाली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी त्याला मिळाली. केदारने टीम इंडियाकडून एकूण 73 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 42.09 च्या सरासरीने 1389 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत केदारने एकूण 27 विकेट्स घेतल्या आहेत.
Former cricketer Kedar Jadhav’s new innings in politics, public entry into BJP
महत्वाच्या बातम्या
- Chief Minister : वैदिक गणितावर आधारित गुणवत्ता केंद्र सुरू करणार , मुख्यमंत्र्यांची माहिती
- Maharashtra भाऊसाहेबांकडचे हेलपाटे वाचले, महाराष्ट्रातील शेतकरी हायटेक झाले, शासनाला ७६ कोटी ८० लाख
- Ashish Shelar लागली बत्ती पार्श्वभागाला की.. आशिष शेलार यांच्यावर टीकेवरून संदीप देशपांडे यांना इशारा
- Kunal Kamra मुंबईत येईल तेव्हा शिवसेना स्टाईलने स्वागत करू…राहुल कनाल यांचा कुणाल कामराला इशारा