विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Amit Shah सहकार विभागाची धुरा सांभाळ्यावर अमित शहा यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. आता प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रात सहकार विभाग उतरत असून ओला उबेरच्या धर्तीवर सहकारी टॅक्सी सेवा सुरू होणार असल्याची माहिती अमित शाह यांनी संसदेत दिली. याअंतर्गत कार, ऑटो आणि बाईक टॅक्सी चालक एकत्र येणार असून संपूर्ण नफा थेट ड्रायव्हरला जाईल . त्याच्याकडून कोणतेही कमिशन घेतले जाणार नाही.Amit Shah
अमित शहा म्हणाले की, आतापर्यंत अशा टॅक्सी सेवांमधून मिळणारे कमिशन धन्ना शेठच्या हातात जायचे आणि ड्रायव्हर बेरोजगार राहायचे. आता हे होणार नाही आणि एक सहकारी टॅक्सी सुरू करण्यात येईल, ज्यामुळे चालकांना त्यांचा थेट नफा मिळण्यास मदत होईल.
अमित शहा यांनी सहकार मंत्रालयाची स्थापना आणि त्यानंतर मंत्रालयाने केलेल्या कामांची माहिती दिली. याच प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह यांनी सांगितले की, “सरकार येत्या काही महिन्यांत ओला-उबर सारखे सहकारी टॅक्सी प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे. तसेच दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहनांची नोंदणी देखील करण्यात येणार आहे.
अमित शहा म्हणाले, सहकारातून समृद्धीचा नारा हा केवळ एक नारा नाही तर आम्ही तो प्रत्यक्षात अंमलात आणला आहे. काही महिन्यांत सहकारी टॅक्सी सेवा येत आहे. ही सहकारी सेवा चारचाकी वाहने, ऑटो आणि दुचाकी वाहनांची नोंदणी करेल. या टॅक्सी सेवेत नोंदणी केल्यानंतर, संपूर्ण फायदा थेट ड्रायव्हरला मिळेल. मोठा भाग कोणत्याही श्रीमंत माणसाच्या हातात जाणार नाही. त्यांनी सांगितले की लवकरच एक सहकारी विमा कंपनी देखील येणार आहे. लवकरच ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी बनेल. खरं तर, उबर आणि ओला सारख्या कंपन्यांच्या सहकार्याने टॅक्सी चालवणाऱ्या चालकांना त्यांच्या कमाईचा काही भाग द्यावा लागतो. सबस्क्रिप्शन फी भरावी लागते आणि ड्रायव्हर्सना प्रत्येक राईडवर कंपनीला एक निश्चित कमिशन देखील द्यावे लागते.
Government taxis will compete with Ola Uber, says Amit Shah, says Cooperatives Department will launch platform
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian सामुहिक बलात्कार झालेला नाही. डाेक्याला जखम झाल्यानेच मृत्यू , दिशा सालियनचा पाेस्टमार्टमचा रिपाेर्ट समाेर
- आजही माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे, आणिबाणीची आपबिती सांगत मुख्यमंत्र्यांचा काॅंग्रेसवर हल्ला
- Harshvardhan Sapkal : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाची लपवाछपवी का?: हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
- Supreme Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय असंवेदनशील ठरवत सर्वोच्च न्यायालयाची