विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Amit Shah निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे मी येथपर्यंत पोहोचलो आहे. सात निवडणुकांमध्ये मी विजय मिळवला आहे. कोणाच्या दयेने आणि मदतीने संसदेत आलो नाही, असा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांना ठणकावले.Amit Shah
राज्यसभेमध्ये गृहमंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा सुरू असताना भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांमध्ये वाद झाला. टीएमसीचे खासदार साकेत गोखले यांनी अमित शाह यांच्यावर एक आक्षेपार्ह टिप्पणी केली. गृहमंत्रालयावरील चर्चेदरम्यान साकेत गोखले यांनी ईडी आणि सीबीआयचा मुद्दा उपस्थित केला. यावर अमित शहा म्हणाले, गृहमंत्रालयासंबंधी चर्चा होत आहे पण साकेत गोखले ईडी आणि सीबीआयची चर्चा करत आहेत. पण तरीही त्यांना हा मुद्दा उपस्थित करायचा असेल तर मलाही संधी द्यावी आणि मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईन.
अमित शाहांच्या या वक्तव्यानंतर साकेत गोखलेंनी त्यांच्यावर एक टिप्पणी केली. त्यानंतर अमित शाह चांगलेच भडकले. ते म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंगालमध्ये निवडणूक हिंसाचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत, जिथे आमच्या कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. तक्रारदारांनी हायकोर्ट गाठले आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने सर्व गुन्हे पुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. हेही तेच प्रकरण आहे. तृणमूल काँग्रेसचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नाही, उच्च न्यायालयावर विश्वास नाही.
https://twitter.com/erbmjha/status/1902354992281108882
सभागृहात जोरदार चर्चा सुरू असताना राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी साकेत गोखले यांना त्यांनी केलेली टिप्पणी मागे घेण्यास सांगितले. त्यावर साकेत गोखले म्हणाले, मी माझे शब्द परत घेणार नाही. फक्त तुमचे नाव अमित शहा आहे, याचा अर्थ तुम्ही हुकूमशाही कराल असा होत नाही.
I have reached this point by winning the elections, not at anyone’s mercy, Amit Shah slams Trinamool Congress MP Saket Gokhale
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची तिच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका
- Devendra Fadanvis : पुण्यात कोयता गँग नाही पण भाई होण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दहशत, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Hemant Rasne : हिंजवडी दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत मागणी
- Eknath Shinde : दोन्ही शिवसेनेत एक्स वॉर, एकनाथ शिंदे राजकीय कीड म्हणाल्याने आदित्य ठाकरेंवर सूर्याजी पिसाळ मनात पलटवार