विशेष प्रतिनिधी
मधुबनी (बिहार) : दहशतवादाचे कंबरडे मोडल्याशिवाय भारत आता स्वस्थ बसणार नाही. दहशवादी कृत्यात सहभागी असणाऱ्या आणि ज्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले आहे त्या प्रत्येकाला शोधून काढून शिक्षा केली जाईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर बिहारच्या मधुबनी येथून प्रथमच जाहीरपणे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आणि जगाला ठाम संदेश दिला
राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदींनी भावनिक शब्दांत हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी उपस्थित जनतेला दोन मिनिटं शांतता पाळण्याचं आवाहन करत म्हणाले,ज्यांनी आपले कुटुंबीय गमावले, त्यांच्यासाठी आपण सगळे एकत्र उभे राहूया. ‘ॐ शांती’चा जप करत त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही प्रार्थना करूया.
दहशतवाद्यांवर कठोर कारवाईचा इशारा देताना पंतप्रधान म्हणाले, “हे हल्ले केवळ निष्पाप पर्यटकांवर नव्हते, तर भारताच्या आत्म्यावर होते. त्यांची कल्पनाही होणार नाही इतक्या कठोर पद्धतीने त्यांना शिक्षा दिली जाईल. भारताचा आत्मा दहशतवादासमोर झुकणार नाही. आम्ही एक आहोत आणि एकत्र आहोत. दहशतवाद्यांना कोणतीही माफी नाही.
जगाला उद्देशून इंग्रजीतून भाष्य करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, India will identify, track and punish every terrorist and their backers.( प्रत्येक दहशतवादी आणि त्याच्या पाठीराख्याला शोधून काढून कठोरात कठोर शिक्षा केली जाईल.) बिहारच्या मातीतून मी सगळ्या जगाला आज सांगतोय. की भारत या दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येकाला ओळखणार आणि कठोरातील कठोर शिक्षा त्यांना देणार. या दहशतवादाला ज्यांनी कोणी प्रोत्साहन दिलयं खत -पाणी घातलंय त्या प्रत्येक मोरक्याला आम्ही शिक्षा दिल्या शिवाय शांत बसणार नाही. दहशतवादाचं कंबरड मोडल्याशिवाय भारत आता स्वस्थ बसणार नाही. दहशतवादाला मूठमाती देण्याची वेळ आता आली आहे. भारताला आणि भारतीयांच्या स्पिरिटला हा दहशतवाद कधीच संपवू शकणार नाही. या कठीण प्रसंगात जे कोणी आमच्या सोबत उभे राहिले ज्यांनी आम्हाला आधार दिला. त्या प्रत्येकाचे मी,मनापासून आभार मानतो.
India will not rest until the scourge of terrorism is broken, warns Prime Minister Narendra Modi
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : उध्दव – राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे भडकले
- Chief Minister : तंत्रज्ञानाच्या मदतीने शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा, मुख्यमंत्र्यांचे डाॅक्टरांना आवाहन
- Supreme Court : मग संसद भवनच बंद करा.. उपराष्ट्रपतींपाठाेपाठ भाजपचे खासदार सर्वाेच्च न्यायालयावर बरसले
- West Bengal : हिंदू असणे हा आमचा गुन्हा आहे का? पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागातील महिलांची राज्यपालांपुढे कैफियत