D Gukesh : बुद्धिबळाचा नवा राजा…ठरला भारताचा डी गुकेश! विजयानंतर अश्रू अनावर झाले

D Gukesh : बुद्धिबळाचा नवा राजा…ठरला भारताचा डी गुकेश! विजयानंतर अश्रू अनावर झाले

D Gukesh

18 वर्षीय डी गुकेश हा बुद्धिबळाच्या खेळात जगातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला.


विशेष प्रतिनिधी

D Gukesh  भारताच्या डी गुकेशने बुद्धिबळात विश्वविजेता बनून इतिहास रचला. 18 वर्षीय डी गुकेश हा बुद्धिबळाच्या खेळात जगातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला. गुरुवारी गुकेशने काळ्या सोंगट्यांसह खेळूनही जागतिक चॅम्पियनशिपच्या 14व्या आणि अंतिम सामन्यात विश्वविजेता चीनच्या डिंग लिरेनचा पराभव केला. या विजयासह गुकेशचे 7.5 गुण झाले. त्याने 7.5-6.5 असा सामना जिंकून विश्वविजेतेपद पटकावले.D Gukesh

विजयानंतर गुकेश भावूक झाला. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तो स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचे अश्रू थांबत नव्हते. गुकेशने रशियाच्या महान गॅरी कास्पारोव्हला मागे टाकले आणि तो वर्ल्ड चॅम्पियन बनला. कास्पारोव्ह हा आतापर्यंतचा सर्वात तरुण जगज्जेता होता. तो 1985 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी चॅम्पियन बनला होता.



चेन्नईचा गुकेश विश्वनाथन हा आनंदनंतर विश्वविजेता बनणारा दुसरा भारतीय आहे. गुकेश हा पाच वेळा विश्वविजेता आनंदचा शिष्य आहे आणि त्याच्या अकादमी, वेस्टब्रिज आनंद बुद्धिबळ अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतो. आनंद हा गुकेशचा आदर्श आहे.

निर्णायक 14वा गेम अनिर्णितकडे जात होता. टायब्रेकरद्वारे विश्वविजेतेपदाचा निर्णय होईल, असे मानले जात होते, परंतु 55व्या चालीत लिरेनने मोठी चूक केली, ज्याचा फायदा गुकेशने घेतला आणि विजय मिळवला.

Indias D Gukesh crowned new chess king

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023