विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रगीताचा अपमान झाल्याचा आरोप खुद्द राज्यपाल आर. एन. रवी यांनी केला आहे. त्यामुळे संतापलेल्या राज्यपालांनी विधानसभेच्या अधिवेशनाला संबोधित न करताच सभागृह सोडले.
राजभवन कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार, तामिळनाडू विधानसभेत एकदा भारताच्या संविधानाचा आणि राष्ट्रगीताचा अपमान करण्यात आला.
राष्ट्रगीताचा आदर करणे हे आपल्या राज्यघटनेत नमूद केलेले पहिले मूलभूत कर्तव्य आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या सुरुवातीला आणि शेवटी राष्ट्रगीत सर्व राज्य विधानमंडळांमध्ये गायले जाते. मात्र, तामिळनाडूच्या विधानसभेत आज राज्यपालांचे आगमन होताच त्यावेळी फक्त राज्यगीत गायले गेले. राज्यपालांनी सभागृहाला आपल्या घटनात्मक कर्तव्याची आदरपूर्वक आठवण करून दिलीय.
सभागृहाचे नेते, सभापती आणि मुख्यमंत्र्यांना राष्ट्रगीत गाण्यासाठी कळकळीने आवाहन केले. मात्र, त्यांनी स्पष्ट नकार दिला. ही गंभीर चिंतेची बाब आहे. राज्यघटना आणि राष्ट्रगीताचा अशा निर्लज्जपणे अनादर करणाऱ्यांची साथ न देता राज्यपालांनी अत्यंत संतापाने सभागृह सोडले, असे राजभवनातील निवेदनात म्हटले आहे.
विधानसभेचे वर्षातील पहिले अधिवेशन बोलवण्यात आले. परंपरेनुसार सत्राची सुरुवात राज्याचे अधिकृत गीत असलेल्या तमिळ थाई वाझ्थूच्या पठणाने झाली. तथापि, राष्ट्रगीत गायले गेले नाही. राज्यपालांनी यालाआक्षेप घेतला, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि सभापती एम अप्पावू यांना आवाहन केले. त्यांची विनंती नाकारण्यात आली. त्यामुळे रवी अधिवेशन सुरू झाल्यानंतर पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात विधानसभेतून बाहेर पडले.
Total censorship of the proceedings of Tamil Nadu State Assembly today reminds the country of the Emergency Days. The people specially the brothers and sisters of Tamil Nadu were deprived of the actual proceedings of the House and conduct of their representatives therein and…
— RAJ BHAVAN, TAMIL NADU (@rajbhavan_tn) January 6, 2025
Insult of National Anthem in Tamil Nadu Assembly, Governor stormed out of the House
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली