विशेष प्रतिनिधी
पुणे : देशातील दहशतवाद संपवण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अधिकाधिक शक्ती प्राप्त व्हावी, यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन अभिषेक केला आणि विशेष प्रार्थना केली.
नड्डा यांनी भारतातून दहशतवादाचे समूळ उच्चाटन व्हावे, सर्वत्र शांतता नांदावी आणि देशबांधवांना सुस्थिती लाभावी, अशी प्रार्थनाही केली.
या वेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. केंद्रीय सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, तसेच प्रकाश चव्हाण, यतिश रासने, तुषार रायकर, सचिन आखाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमात ट्रस्टच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती आमदार हेमंत रासने यांनी नड्डा यांना दिली.
यानंतर माध्यमांशी संवाद साधताना नड्डा म्हणाले, “पेहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी सडेतोड उत्तर देतील, असा आमचा विश्वास आहे. भारत या संकटातून अधिक बलवान होऊन बाहेर येईल आणि दोषींना कठोर शिक्षा मिळेल. भारताला बुद्धी व शक्ती देण्यासाठी मी गणरायाकडे प्रार्थना केली आहे.”
J. P. Nadda prays for the country, worships ‘Dagdusheth’ Ganesha to give strength to Modi
महत्वाच्या बातम्या
- पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधानांवर आरोप करणाऱ्या एआययूडीएफ आमदार अमिनुल इस्लाम यांना अटक
- Muslim Organizations : पाकिस्तानला धडा शिकवा, मुस्लिम संघटनांची मागणी
- PSL Broadcast Stopped : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताचा मोठा झटका; पीएसएलचे भारतात प्रसारण थांबवले
- Michael Rubin : काश्मीर पाकिस्तानच्या गळ्याची नस असेल, तर भारताने आता त्याचा गळाच कापावा, अमेरिकन थिंक टँक सदस्य मायकेल रुबिन यांचा टोला