अनुराग ठाकूर, प्रियंका गांधी यांच्यासह ‘या’ खासदारांचा समावेश
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : वन नेशन-वन इलेक्शन विधेयकासाठी जेपीसीची स्थापना करण्यात आली आहे. यात अनुराग ठाकूर, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक खासदार सहभागी होणार आहेत. या समितीत लोकसभेच्या 21 आणि राज्यसभेच्या 10 सदस्यांची नावे आहेत.
जेपीसीमध्ये लोकसभेचे 21 सदस्य आहेत. यामध्ये पी.पी. चौधरी, सी.एम. रमेश, बन्सुरी स्वराज, पुरुषोत्तमभाई रुपाला, अनुराग ठाकूर, विष्णू दयाल राम, भत्रीहरी महताब, संबित पात्रा, अनिल बलुनी, विष्णू दत्त शर्मा, प्रियांका गांधी वड्रा, मनीष तिवारी, सुखदेव भगत, धर्मेंद्र यादव, कल्याण बॅनर्जी, टी.एम. सेल्वगणपती, जी.एम. हरीश बालयोगी, सुप्रिया सुळे, श्रीकांत एकनाथ शिंदे, चंदन चौहान आणि बालशौरी वल्लभनेनी यांच्या नावांचा समावेश आहे.
लोकसभेत विधेयक मांडल्यानंतर सरकारने मतदान केले आणि नंतर ते जेपीसीकडे पाठवले. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाच्या 17 व्या दिवशी सरकारने एक देश, एक निवडणूक विधेयक लोकसभेत मांडले आणि ते मंजूरही झाले विधेयकाच्या बाजूने 269 मतं पडली. तर राज्यसभेत संविधानावर चर्चा सुरू आहे.
आज दुसऱ्या दिवशीही राज्यसभेत संविधानावर चर्चा होणार आहे. याआधी शुक्रवारी आणि शनिवारी लोकसभेत संविधानावर चर्चा झाली. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेला उत्तर दिले.