विशेष प्रतिनिधी
मुंबई ; भारताचे २६ निरपराध हिंदू पर्यटक पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात बळी पडल्याने पार्श्वभूमीवर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता. याच काळात बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर – खान दुबईत पाकिस्तानी डिझायनर फराझ माननसोबत फोटो काढून मजा करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरातून करीनावर संतापाचा भडका उडाला आहे.
२७ एप्रिल रोजी फराझ माननने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर करीना कपूरसोबतचा फोटो शेअर केला. “With the OG” असे कॅप्शन देत त्या दोघांनी जेवणानंतरचे क्षण टिपल्याचे दिसते. ही दृश्यं पाहून शोकसंतप्त भारतीयांनी करीनावर “गद्दार”, “देशद्रोही” अशा शब्दांत टीकेचा भडिमार केला आहे.
करिना कपूरची फराझ माननसोबत जुनी व्यावसायिक मैत्री आहे. माननचे दुबईत स्टोअर आहे. तो मूळचा पाकिस्तानचा नागरिक आहे.
संपूर्ण देश पाकिस्तानशी कोणताही संपर्क तोडत असताना, पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आलेली असताना, करीनाचा ही वागणूक देशभक्त नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे, असा संतप्त सूर सध्या सोशल मीडियावर उठला आहे.
केवळ करीना कपूरच नाही, तर कियारा अडवाणी, अदिती राव हैदरी, तारा सुतारिया, नीतू कपूर, सोनम कपूर, सारा अली खान, जान्हवी कपूर, महीप कपूर, कार्तिक आर्यन, पुलकित सम्राट, आदर जैन यांसारखे अनेक कलाकारही फराझ माननला सोशल मीडियावर फॉलो करतात. फराझने यापूर्वी दीपिका पदुकोण, रणबीर कपूर आणि अनन्या पांडे यांसोबतही काम केले आहे.
देशावर हल्ला करणाऱ्यांशी संबंध ठेवणाऱ्यांना आपण अभिमानाने स्टार मानावे का? असा सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे .
Kareena Kapoor celebrates with Pakistani designer after Pahalgam massacre; criticized as a traitor
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती