विशेष प्रतिनिधी
मुंबई : Kunal Kamra स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराचा बोलवता धनी कोण आहे? कारण घटनाक्रम देखील लक्षात घेतला पाहिजे. कुणाल कामराचे सीडीआर तपासले जाणार असून बँक खात्याचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृह राज्य मंत्री योगेश कदम यांनी सभागृहात बोलताना दिली आहे.Kunal Kamra
कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे रचून ते शोमध्ये सादर केल्याप्रकरणी आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरून कुणाल कामराच्या विरोधात शिवसेनेचे (शिंदे) नेते आक्रमक झाले आहेत. कुणाल कामराविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच कुणाल कामराच्या गाण्यावरून सुरु झालेल्या वादावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया देत कारवाईचे संकेत दिले आहेत. यानंतर आता राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत बोलताना एक मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले, सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तींवर अशा प्रकारची वक्तव्य केली जात असतील तर याबाबत सरकार अतिशय गंभीर आहे.
अजिबात कोणाला सोडलं जाणार नाही. अशा प्रकारची स्टॅण्डअप कॉमेडी आम्ही चालू देणार नाहीत. कुणाल कामराचा बोलवता धनी कोण आहे? कारण घटनाक्रम देखील लक्षात घेतला पाहिजे. काही ठराविक ट्वीट केले गेले आहेत. सर्व विषयांचे गांभीर्य लक्षात घेता कुणाल कामराचे सीडीआर तपासले जातील, सर्व कॉल रेकॉर्ड तपासले जातील. बँक खात्याची चौकशी केली जाईल, याचा सुत्रधार कोण? आणि असेल तर त्याची देखील चौकशी केली जाईल”, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात दिली आहे.
तुम्ही जरुर स्टँडअप कॉमेडी करा, पण अपमानित करण्याचं काम कोणी करत असेल तर हे सहन केलं जाणार नाही. हे अतिशय चुकीचं आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे. तसेच कुणाल कामरा जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत, ते संविधान जर त्यांनी वाचलं असेल तर संविधानाने सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही. त्यामुळे आमची मागणी आहे की त्यांनी माफी मागितली पाहिजे”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Kunal Kamra is speaking on whose instructions, will check CDR, will also investigate bank account, information from the Minister of State for Home Affairs
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप