विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : Chitra Tripathi जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या एबीपी न्यूजच्या वरिष्ठ पत्रकार चित्रा त्रिपाठी यांच्यावर स्थानिकांकडून हल्लासदृश घेराव करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्रिपाठी या घाबरलेल्या अवस्थेत आपले काम करत असल्याचे स्पष्टीकरण देत आहेत, मात्र उपस्थित जमाव त्यांच्यावर घोषणाबाजी करत राहतो.Chitra Tripathi
व्हायरल व्हिडिओमध्ये चित्रा त्रिपाठी स्थानिक महिलांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की, “मी एक पत्रकार आहे. मी फक्त माझं काम करत आहे.” मात्र, महिलांच्या मागे उभा असलेला जमाव त्यांना सतत त्रास देत राहतो. त्रिपाठी यांचा संताप अनावर होतो आणि त्या म्हणतात, “मी पत्रकार आहे, तुम्ही मला शिव्या देता आहात, हे खूप चुकीचं आहे… तुम्हाला मारायचं असेल तर मारा.”
यानंतर काही युवकांनी ‘गोदी मीडिया हाय-हाय’ अशा घोषणा दिल्या. ‘गुलिस्तान हम शर्मिंदा हैं, तेरे कातिल जिंदा हैं’ अशी घोषणाही देण्यात आली. एकीकडे ‘हिंदू-मुस्लिम भाई-भाई’ अशा घोषणा देणारेही काही लोक दिसत होते, मात्र एकंदरीत वातावरण तणावपूर्ण होते.
या घटनेचा व्हिडिओ आसामचे मंत्री अशोक सिंगल यांनी देखील शेअर केला असून त्यांनी लिहिले, “चित्रा त्रिपाठी यांना अक्षरशः लिंच करण्याचा प्रयत्न झाला. हीच काश्मीर आणि काश्मिरीयतची वास्तवता आहे. ज्यांचं अस्तित्वच भारताच्या विनाशावर अवलंबून आहे, त्यांच्याशी शांततेची चर्चा कशी करता येईल?”
Chitra Tripathi was almost lynched. This is the reality of Kashmir and Kashmiriyat.
You cannot negotiate peace with those whose existence depends on your annihilation.
More power to you, @chitraaum pic.twitter.com/VlyuDFr4QQ
— Ashok Singhal (@TheAshokSinghal) April 23, 2025
ज्येष्ठ पत्रकार अशोक श्रीवास्तव यांनीही यावर टीका केली आहे. त्यांनी लिहिलं, “२४ तासांपूर्वी हिंदूंना धर्म विचारून मारलं गेलं आणि आता जे पत्रकार या सत्य समोर आणण्यासाठी रिपोर्टिंग करत आहेत त्यांनाही लक्ष्य केलं जात आहे. रिपब्लिक टीव्ही आणि एबीपीच्या महिला पत्रकारांना घेरलं गेलं आणि त्यांच्यावर ‘गोदी मीडिया हाय-हाय’च्या घोषणा देण्यात आल्या.”
या व्हिडिओवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहीजण चित्रा त्रिपाठी यांचे धैर्य वाढवत आहेत, तर काहीजण त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याला योग्य ठरवत आहेत. योग्य ठरवणारे लोक म्हणत आहेत की, मीडियाने ‘इस्लामी दहशतवाद्यांनी हिंदूंना लक्ष्य केलं’ हे दाखवलं म्हणून त्यांचा विरोध होतोय.
मात्र, पहलगाम हल्ल्याचे साक्षीदार आणि वाचलेले पर्यटक स्पष्ट सांगत आहेत की, दहशतवाद्यांनी नाव विचारले, कपडे उतरवायला लावले आणि सुंता आहे की नाही हे पाहूनच कोण हिंदू आहे ते ओळखून गोळ्या झाडल्या.
Locals surround journalist Chitra Tripathi who was covering the Pahalgam attack; slogans against ‘Godi Media’, video goes viral on social media
महत्वाच्या बातम्या
- पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधानांवर आरोप करणाऱ्या एआययूडीएफ आमदार अमिनुल इस्लाम यांना अटक
- Muslim Organizations : पाकिस्तानला धडा शिकवा, मुस्लिम संघटनांची मागणी
- PSL Broadcast Stopped : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताचा मोठा झटका; पीएसएलचे भारतात प्रसारण थांबवले
- Michael Rubin : काश्मीर पाकिस्तानच्या गळ्याची नस असेल, तर भारताने आता त्याचा गळाच कापावा, अमेरिकन थिंक टँक सदस्य मायकेल रुबिन यांचा टोला