विशेष प्रतिनिधी
चेन्नई: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने Kunal Kamra त्याची अटक टाळण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली. अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता. मद्रास उच्च न्यायालयाने कुणाल कामराला दिलासा देत अटपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. ७ एप्रिलपर्यंत कुणाल कामराला दिलासा मिळाला आहे. कुणाल कामराने आपल्याला धमक्यांचे ५०० फोन कॉल्स आल्याचं न्यायालयाला सांगितलं.
कॉमेडियन कुणाल कामराने मागच्या रविवारी एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओत त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे रचले होते. या गाण्यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला. शिवसैनिकांनी ज्या ठिकाणी हा शो झाला त्या हॉटेलची तोडफोड केली. कुणाल कामराच्या विरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले. मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला दोनदा समन्स बजावलं. त्यानंतर त्याने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्याला दिलासा दिला आहे.
कुणाल कामरांच्या वकीलांनी त्याची बाजू मद्रास उच्च न्यायालयात मांडली. त्यांनी सांगितलं कुणाल कामराला धमक्यांचे ५०० कॉल्स आले आहेत. कुणाल कामराने जे गाणं गायलं त्यात त्याने कुठेही एकनाथ शिंदे हे नावही घेतलं नाही. तरीही विडंबनात्मक गाणं रचल्यामुळे आणि ते गायल्यामुळे त्याला ५०० धमक्यांचे कॉल्स आले. यामुळे त्याला जामीन दिला जावा. कारण त्याच्या जिवाला धोका आहे.
कुणाल कामराला ५०० हून अधिक धमक्या आल्या. त्या धमक्यांचा सूर आम्ही तुला शिवसेना स्टाईलने धडा शिकवू असाच होता. शिवसेना स्टाईल धडा शिकवणं म्हणजे काय हे सगळ्यांनाच माहीत आहे असे कुणाल कामराच्या वकिलांनी सांगितलं. माझे अशील कुणाल कामरा यांनी विनोद बुद्धीने गाणं रचलं. त्यांनी त्या गाण्यात कुठेही एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं नाही. तरीही त्यांना धमक्या देण्यात येत आहेत.
न्यायमूर्ती सुंदर मोहन यांच्या खंडपीठाने हा अर्ज मंजूर करताना म्हटले आहे की, कुणाल कामरा यांनी प्राथमिकदृष्ट्या मद्रास उच्च न्यायालयाला खात्री पटवून दिली की तो संरक्षणासाठी महाराष्ट्रातील न्यायालयांमध्ये जाऊ शकत नाहीत. या प्रकरणात कोठडीत चौकशी करण्याची आवश्यकता नाही आणि महाराष्ट्रातील मंत्री आणि पक्षाचे कार्यकर्ते धमक्या देत असल्याने कामरा जामीनासाठी येथील न्यायालयांमध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील न्यायालयांमध्ये अंतरिम अटकपूर्व जामीन नंतर मागितला जाईल
Madras High Court gives relief to Kunal Kamra, protects him from arrest
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian सामुहिक बलात्कार झालेला नाही. डाेक्याला जखम झाल्यानेच मृत्यू , दिशा सालियनचा पाेस्टमार्टमचा रिपाेर्ट समाेर
- आजही माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे, आणिबाणीची आपबिती सांगत मुख्यमंत्र्यांचा काॅंग्रेसवर हल्ला
- Harshvardhan Sapkal : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाची लपवाछपवी का?: हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
- Supreme Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय असंवेदनशील ठरवत सर्वोच्च न्यायालयाची