विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : स्वातंत्र्यानंतर पन्नास वर्षांनी काश्मीरमध्ये रेल्वे सुविधा पाेहाेचविणारे माेदी सरकार आता काश्मीरला वंदे भारत ट्रेनची भेट देणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ एप्रिल रोजी कटरा येथे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.
उधमपूरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत. याप्रसंगी जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) १९ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरला येत आहेत. त्याचे लँडिंग उधमपूरमध्ये होईल. यानंतर ते जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची पाहणी करतील आणि त्याचे उद्घाटन करतील.नंतर मोदी कटरा येथे पोहोचतील आणि वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.
सध्या जम्मू रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने काही महिने ट्रेन कटरा येथून चालवविले जात आहे.ऑगस्टच्या सुमारास हे काम पूर्ण झाल्यावर ही ट्रेन जम्मूहून नियमितपणे धावेल असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
२०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदी यांनी कटरा रेल्वे स्टेशन राष्ट्राला समर्पित केले होते. पहिली ट्रेन १९७२ मध्ये जम्मूला पोहोचली. मात्र, काश्मीर मध्ये ट्रेन पोहचविण्यासाठी आपल्याला ५० वर्षे वाट पहावी लागली. आता आपल्याला ही सुविधा मिळणार आहे आणि मला विश्वास आहे की ही केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी एक ऐतिहासिक कामगिरी असेल असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
Medhi government’s visit to Kashmir by Vande Bharat train
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
- Kunal Kamra कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकेपासून संरक्षण
- Anna Bansode : विधानसभा उपाध्यक्षपदी निवड अन् दोन दिवसात अण्णा बनसोडेंना उच्च न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश
- Prashant Koratkar प्रशांत कोरटकर यांच्यावर न्यायालयातच वकिलाचा हल्ला