विशेष प्रतिनिधी
नागपूर ,: Narendra Modi देशातील गरीब मुलांना डॉक्टर बनता यावे यासाठी पहिल्यांदाच मातृभाषेत वैद्यकीय शिक्षण देण्यास सुरुवात करत आहोत. ते भाषेच्या अडथळ्याशिवाय त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरात माधव नेत्रालय प्रीमियर सेंटरच्या नवीन इमारतीची पायाभरणी करण्यात आली. यावेळी बोलताना ते म्हणाले, आम्ही केवळ वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट केली नाही तर एम्स संस्थांची संख्याही वाढवली आहे. अधिकाधिक डॉक्टर उपलब्ध व्हावेत यासाठी वैद्यकीय जागांची संख्याही दुप्पट करण्यात आली आहे. गरिबांना स्वस्त दरात औषधे पुरवत आहोत. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कोट्यवधी लोकांना मोफत उपचार सुविधा मिळत आहेत. हजारो जनऔषधी केंद्रे देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणाऱ्या दरात औषधे पुरवत आहेत. देशभरातील शेकडो डायलिसिस सेंटर मोफत डायलिसिस सेवा देऊन हजारो कोटी रुपयांची बचत करत आहेत. गेल्या 10 वर्षांत, गावांमध्ये लाखो आयुष्यमान आरोग्य मंदिरे बांधण्यात आली आहेत. देशातील सर्वोत्तम डॉक्टरांकडून टेलिमेडिसिनद्वारे सल्लामसलत, प्रथमोपचार आणि पुढील वैद्यकीय मदत दिली जात आहे.
लाल किल्ल्यावरून बोलताना मी आपले सरकार सर्व क्षेत्रात करत प्रयत्नांबाबत माहिती दिली होती. देशासाठी काम केलेल्या वृद्धांना आरोग्याची समस्या होऊ नये, याकरिता त्यांना चांगले उपचार देणे ही सरकारची निती आहे. आयुष्यमान भारतच्या माध्यमातून लोकांना चांगले उपचार मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आजपासून नवरात्रीचा पवित्र पर्व सुरू होत आहे. देशातील वेगवेगळ्या कोपऱ्यात आज गुढीपाडवा, उगादीचा उत्सव सुरू आहे. आज भगवान झुलेलाल आणि गुरु अंगत देव यांचा अवतरण दिवसही आहे. आपले प्रेरणास्रोत डॉ. हेडगेवार यांच्या जयंतीचेही निमित्त आहे. संघाच्या गौरवशाली प्रवासाला 100 वर्षही पूर्ण होत आहे. आज या निमित्ताने मला स्मृती मंदिरात जाऊन डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी मिळाली. आपण संविधानाच्या 75 वर्षाचा उत्सव साजरा केले आहे. पुढच्या महिन्यात बाबासाहेबांची जयंती आहे. मी दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना नमन केले आहे. या विभूतींना नमन करताना देशवासियांना नवरात्री आणि सर्व पर्वांच्या शुभेच्छा देतो.
Medical education through mother tongue, Prime Minister Narendra Modi announces
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
- Kunal Kamra कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकेपासून संरक्षण
- Anna Bansode : विधानसभा उपाध्यक्षपदी निवड अन् दोन दिवसात अण्णा बनसोडेंना उच्च न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश
- Prashant Koratkar प्रशांत कोरटकर यांच्यावर न्यायालयातच वकिलाचा हल्ला