विशेष प्रतिनिधी
बंगळुरू:Microsoft येत्या दोन वर्षांत मायक्रोसॉफ्ट भारतातील एआयसंदर्भातल्या कौशल्य विकास व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तब्बल ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. त्यामध्ये हिंजवडी येथील डेटा सेंटरचे (विस्तारीकरण) एक्सपांशन होणार आहे.Microsoft
एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात भारताला पहिल्या प्राधान्याचा देश बनवण्याचा मानस मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी व्यक्त केला आहे. बंगळुरूमधील मायक्रोसॉफ्ट एआय टूर कार्यक्रमात बोलताना सत्या नडेलांनी ही घोषणा केली आहे. पुढील दोन वर्षांत ही सर्व गुंतवणूक मायक्रोसॉफ्टकडून केली जाणार असून त्याअंतर्गत भारतात नवीन डेटा सेंटर्स उभारण्याचं नियोजन कंपनीनं केलं आहे. सध्या भारतात मायक्रोसॉफ्टचे तीन डेटा सेंटर्स आहेत. येत्या दोन वर्षांत म्हणजेच २०२६पर्यंत कंपनीचं चौथं डेटा सेंटरदेखील कार्यरत होण्याची शक्यता आहे.
हिंजवडीत मायक्रोसॉफ्ट चे एक डेटा सेंटर असून गेल्या सप्टेंबरमध्ये या डेटा सेंटरचे एक्सपांशन करण्यासाठी त्यांनी जमीन देखील खरेदी केली होती. त्यामुळे महाराष्ट्राला AI मध्ये leader state करण्यासाठी ही एक मोठी सुवर्णसंधी असू शकते. आता राज्यसरकारने त्वरित पाठपुरावा करून केंद्राच्या समन्वयाने मायक्रोसॉफ्ट ची अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत,अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
Microsoft to invest 3 billion dollars in India, expansion of data center in Hinjewadi
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली