विशेष प्रतिनिधी
रायपूर : छत्तीसगढमधील बीजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात नऊ जवान शहीद झाले. जवानांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनावर नक्षलवाद्यांनी हलका केला आहे. कुटरू भागात ही घटना घडली.
सोमवारी कुटरू भागात नक्षलवाद्यांनी जवानांच्या चिलखती वाहनाला लक्ष्य केलं. नक्षलवाद्यांनी वाहनावर IED ब्लास्ट करत स्फोट घडवून आणल्याची माहिती आहे. या स्फोटात काही जवान शहीद झाले आहेत. इतर अनेक जवान गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे.
वानांना घेऊन जाणाऱ्या लष्काराच्या वाहनावर ज्यावेळी नक्षलवाद्यांनी हल्ला केला, त्यावेळी जवान ऑपरेशनवरुन निघाले होते. दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूरचे संयुक्त ऑपरेशन दल ऑपरेशननंतर परतत असताना नक्षलवाद्यांनी विजापूर जिल्ह्यातील कुत्रु-बेद्रे रस्त्यावर हा हल्ला केला. दुपारी 2:15 वाजता, नक्षलवाद्यांनी कुत्रूबेली गावाजवळ आयईडीचा स्फोट करून सुरक्षा दलाचे वाहन उडवले.
बस्तरच्या महानिरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, बीजापूरमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात दंतेवाडातील नऊ जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात जवानांना घेऊन निघालेल्या वाहनाच्या ड्रायव्हरचाही मृत्यू जाला आहे. हे सर्व जवान दंतेवाडा, नारायणपूर आणि बीजापूरमध्ये संयुक्त कारवाई करून परतत होते.
आयजी बस्तर पी. सुंदरराज म्हणाले, या हल्ल्यात आठ डीआरजी जवान आणि दंतेवाडातील एका चालकासह नऊ जवान शहीद झाले. दंतेवाडा, विजापूर आणि नारायणपूर जिल्ह्यांतील सीमावर्ती भागात गेल्या तीन दिवसांपासून नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे.
Nine jawans martyred in an attack by Naxalites in Chhattisgarh
महत्वाच्या बातम्या
- या खासदाराची चड्डी सुद्धा जागेवर राहणार नाही, सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा बजरंग सोनवणे यांना इशारा!
- भिकारी वाढलेत, शिर्डीतील साईबाबा संस्थानचे मोफत जेवणावर सुजय विखेंची टीका
- Devendra Fadnavis : भाजप, कम्युनिस्ट सोडता सर्व 2300 पक्ष खाजगी मालकीचे, देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- अडीच वर्ष शिव्या-शाप देणाऱ्यांचे तोंड महाराष्ट्रातील जनतेने बंद केले, एकनाथ शिंदे यांचा टोला