विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : वक्फ सुधारणा विधेयकाचा उद्देश मुस्लिमांना अपमानित करणे आहे. हे कलम २५, २६ चे उल्लंघन आहे. हे विधेयक मुस्लिमांवर अन्याय करणारे आहे, असा आरोप करत एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी चक्क लाेकसभेत वक्फ विधेयक फाडले आणि ते निघून गेले.
अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 सादर केले आहे. गेल्या ११ तासांपासून या विधेयकावर चर्चा होत आहे. ओवेसी यांनी सुमारे अर्धा तास या विधेयकावर आपली भूमिका मांडली. भाजपा देशात संघर्ष निर्माण करत असल्याचा आरोप करत ते म्हणाले, तसेच महात्मा गांधी यांनी जसे आफ्रिकेत कायदा फाडलेला तसे मी हे वक्फ विधेयक फाडत विरोध दर्शविला आहे. या विधेयकाचा उद्देश मुस्लिमांना अपमानित करणे आहे. हे कलम २५, २६ चे उल्लंघन आहे. हे विधेयक मुस्लिमांवर अन्याय करणारे आहे.
नॅशनल कॉन्फरन्सचे मियां अल्ताफ म्हणाले की, आणले जाणारे विधेयक मुस्लिमांच्या विरोधात आहे. तुम्ही राज्य सरकारांचे अधिकार हिसकावून घेतले आहेत. आम्हाला या देशाचा अभिमान आहे. हे एका विशिष्ट वर्गाविरुद्ध आणण्यात आले आहे. भारत धर्मनिरपेक्षतेसाठी ओळखला जातो. हे विधेयक त्या धर्मनिरपेक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते.दरम्यान, केरळ काँग्रेसने वक्फ विधेयकाला पाठिंबा दिला आहे. लोकसभेत वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान विधेयकाचे समर्थन करताना, केरळ काँग्रेसचे खासदार अॅडव्होकेट के फ्रान्सिस जॉर्ज यांनीही दुरुस्तीसाठी काही सूचना केल्या आहेत. “,
Owaisi tore up the Waqf Amendment Bill saying it was meant to humiliate Muslims
महत्वाच्या बातम्या
- Chief Minister : वैदिक गणितावर आधारित गुणवत्ता केंद्र सुरू करणार , मुख्यमंत्र्यांची माहिती
- Maharashtra भाऊसाहेबांकडचे हेलपाटे वाचले, महाराष्ट्रातील शेतकरी हायटेक झाले, शासनाला ७६ कोटी ८० लाख
- Ashish Shelar लागली बत्ती पार्श्वभागाला की.. आशिष शेलार यांच्यावर टीकेवरून संदीप देशपांडे यांना इशारा
- Kunal Kamra मुंबईत येईल तेव्हा शिवसेना स्टाईलने स्वागत करू…राहुल कनाल यांचा कुणाल कामराला इशारा