विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली ,: Defense Minister पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेवर पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी वल्गना करत थेट “संपूर्ण युद्ध” होण्याचा इशारा दिला आहे. भारताने पुढील पावले उचलली तर दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमध्ये पूर्ण युद्ध होऊ शकते आणि जगाने याची चिंता केली पाहिजे.Defense Minister
स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफ यांनी सांगितले की, आमचे लष्कर कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज आहे. जर भारताकडून मोठा हल्ला झाला, तर आमच्याकडूनही पूर्ण प्रतिसाद दिला जाईल.” वाद चर्चेतून सोडवता येईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
गंभीर गोष्ट म्हणजे ख्वाजा आसिफ यांनी कोणताही पुरावा न देता भारतानेच पहलगाम हल्ला ‘स्टेज’ केला असल्याचा दावा केला. ते म्हणाले,
“ही घटना भारताने मुद्दाम घडवली आहे, संकट निर्माण करून पाकिस्तानवर दोष देण्याचा कट आहे.
मात्र, जेव्हा स्काय न्यूजच्या पत्रकाराने पाकिस्तानच्या दहशतवादी गटांना समर्थन देण्याच्या इतिहासाबद्दल विचारले, तेव्हा आसिफ यांनी कबुली दिली की,
“पाकिस्तानने अमेरिकेसाठी आणि पश्चिमेकडील देशांसाठी गेली तीन दशके ‘डर्टी वर्क’ केले आहे. सोव्हिएत युद्धापासून ९/११ नंतरच्या युद्धात पाकिस्तानने मोठी चूक केली आणि त्याचे परिणाम आज भोगावे लागत आहेत.”
भारताने पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू जल करार निलंबित केला, अटारी आयसीपी (इंटिग्रेटेड चेक पोस्ट) बंद केला, सार्क व्हिसा सवलत योजना स्थगित केली आणि पाकिस्तानातील नागरिकांना ४० तासांत देश सोडण्याचे आदेश दिले.
तसेच दोन्ही देशांच्या उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णयही घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ठाम शब्दांत देशाला आश्वस्त केले आहे की, “या हल्ल्याचे सूत्रधार आणि दहशतवादी गुन्हेगार यांना अशा शिक्षा दिली जाईल, ज्या त्यांच्या कल्पनेपलीकडील असतील. आता भारतातील १४० कोटी लोकांचे संकल्पशक्ती दहशतवाद्यांच्या मुळावर घाव घालेल.”
Pakistan’s Defense Minister’s statement, a threat of nuclear war to India
महत्वाच्या बातम्या
- पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधानांवर आरोप करणाऱ्या एआययूडीएफ आमदार अमिनुल इस्लाम यांना अटक
- Muslim Organizations : पाकिस्तानला धडा शिकवा, मुस्लिम संघटनांची मागणी
- PSL Broadcast Stopped : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताचा मोठा झटका; पीएसएलचे भारतात प्रसारण थांबवले
- Michael Rubin : काश्मीर पाकिस्तानच्या गळ्याची नस असेल, तर भारताने आता त्याचा गळाच कापावा, अमेरिकन थिंक टँक सदस्य मायकेल रुबिन यांचा टोला