विशेष प्रतिनिधी
बीड : Beed बीड जिल्हा कारागृहात झालेल्या राड्याची अखेर पोलिसांनी कबुली दिली आहे. मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला कारगृह प्रशासनाकडून हाणामारीचा इन्कार करण्यात आला होता. मात्र वाल्मिक कराड याचे नाव गुन्ह्यात नाही.
महादेव गित्ते आणि वाल्मिक कराड यांच्यात कारागृहात मारामारी झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र प्रशासनाने दाखल केलेल्या गुन्ह्यात वाल्मिक कराडचे नाव कुठेच नाही. कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून सुदीप सोनवणे व राजेश वाघमोडेंवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.Beed
बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गित्ते, राजेश वाघमोडे, राजाभाऊ नेहरकर, मुकुंद गित्ते यांच्यासह बनावट नोटा प्रकरण आणि गोळीबार प्रकरणातील आरोपी अक्षय आठवले व त्याचे सहकारी बीड जिल्हा कारागृहात होते. तर, संतोष देशमुख हत्याकांडातील वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, महेश केदार, विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे हे सात आरोपी देखील बीड कारागृहात आहेत.
कारागृहाच्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी सुदीप सोनवणे आणि बापू आंधळे खून खटल्यातील राजेश वाघमोडे यांच्यात मारामारी झाली. वास्तविक चर्चा महादेव गित्ते टोळीकडून वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याची होती. या मारहाणीत अक्षय आठवले याने गित्ते गँगला मदत केल्याचे म्हटले गेले होते. या हाणामारीच कारागृह प्रशासनाने इन्कार केला मात्र गित्ते गँगच्या चार जणांची मंगळवारी हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली होती.
कारागृह प्रशासनातील शिपाई संतोष नवले यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये सुदीप सोनवणे आणि राजेश वाघमोडे यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये वाल्मिक कराड किंवा त्यांच्या गँगच्या एकाचेही नाव नाही. त्यामुळे त्यांना वाचवले जात आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
बीड जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, तुरुंग प्रशासनाने आमदार धस यांचा दावा फेटाळला होता. तुरुंगात हाणामारी झालीच नाही, असा पवित्रा प्रशासनाने घेतला होता. कराड गँग आणि गित्ते गँग यांच्यात हाणामारी झाली असेल तर दोन्ही गँगच्या आरोपींना दुसऱ्या कारागृहात हलवणे आवश्यक होते, मात्र गित्ते गँग आणि अक्षय आठवले यांनाच बीड कारागृहातून हलवण्यात आले. गित्ते गँग हर्सूल कारागृहात आणि आठवले गँगच्या आरोपींना नाशिक कारागृहात पाठवण्यात आले. त्यामुळे तुरुंगात मारामारी नेमकी कोणात झाली, याबद्दल अजूनही संभ्रम आहे.
महादेव गित्तीची पत्नी मीरा यांनी तुरुंगातील सीसीटीव्ही फुटेज उघड करावे अशी मागणी केली आहे. माझ्या पतीला कराड गँगकडून मारहाण करण्यात आली असून त्याला रुग्णालयात दाखल न करता दुसऱ्या तुरुंगात पाठवण्यात आले, असाही आरोप मीरा गित्ते यांनी केला आहे.
Police register case in Beed jail fight
महत्वाच्या बातम्या
- Chief Minister : वैदिक गणितावर आधारित गुणवत्ता केंद्र सुरू करणार , मुख्यमंत्र्यांची माहिती
- Maharashtra भाऊसाहेबांकडचे हेलपाटे वाचले, महाराष्ट्रातील शेतकरी हायटेक झाले, शासनाला ७६ कोटी ८० लाख
- Ashish Shelar लागली बत्ती पार्श्वभागाला की.. आशिष शेलार यांच्यावर टीकेवरून संदीप देशपांडे यांना इशारा
- Kunal Kamra मुंबईत येईल तेव्हा शिवसेना स्टाईलने स्वागत करू…राहुल कनाल यांचा कुणाल कामराला इशारा