विशेष प्रतिनिधी
New Delhi: पंजाब नॅशनल बँकेत 13,500 कोटी रुपयांचा घोटाळा करून देशाबाहेर पसार झालेल्या हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला (Mehul Choksi) अखेर बेल्जियम पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या विनंतीवरून करण्यात आली असून सीबीआयच्या (CBI) सूचनेवरून अटकेची कार्यवाही झाली आहे.
मेहुल चोक्सी बेल्जियममधील अँटवर्प येथे आपल्या पत्नी प्रीती चोक्सीसोबत वास्तव्यास होता. त्याच्या पत्नीला बेल्जियमचे नागरिकत्व असून चोक्सीकडे ‘एफ रेसिडेन्सी कार्ड’ आहे. तो उपचारांसाठी अँटिग्वाहून बेल्जियममध्ये आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
बेल्जियम पोलिसांनी चोक्सीला अटक करताना, मुंबई न्यायालयाने 23 मे 2018 व 15 जून 2021 रोजी जारी केलेल्या अटक वॉरंट्सचा हवाला दिला. सध्या चोक्सीला कर्करोगाचे निदान झाल्याने तो अटकेपासून सुटका मिळवण्यासाठी तेथील न्यायालयात अर्ज करू शकतो.
चोक्सी व त्याचा भाचा नीरव मोदी हे दोघेही पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचे मुख्य आरोपी असून त्यांनी बँकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून फसवणूक करून त्यांच्या कंपन्यांना LOU व फॉरेन लेटर्स ऑफ क्रेडिट मिळवून दिले, असा आरोप आहे.
त्याच्यावर फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून कारवाई सुरू असून त्याच्या संपत्तीवर जप्तीची प्रक्रियाही चालू आहे. यासोबतच भारत सरकारने त्याचा पासपोर्ट रद्द केला आहे. अटकेमुळे आता त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच तो भारतात आणला जाण्याची शक्यता आहे.
Punjab National Bank scam, Mehul Choksi arrested in Belgium
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis शेतकऱ्यांना पुढील वर्षीपर्यंत १२ तास मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- Sanjana Ghadi : शिवसेना ठाकरे गट ठराविक गटाच्या ताब्यात; संजना घाडींचा उध्दव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करताना टोला
- लाडक्या बहिणींमुळे निवडून आलो, गुलाबराव पाटील म्हणाले मला गॅरंटी नव्हती
- चंद्रकांत खैरे ढोंगी माणूस, आता त्यांनी नातवंडं सांभाळावीत, संदीपान भुमरे यांची टीका