विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात संतापाचे वातावरण असताना काही राजकीय पक्ष घाणेरडं राजकारण करत असल्याचा आरोप करत, बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती (Mayawati) यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला थेट इशारा दिला आहे. “पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने जी पावले उचलली आहेत, त्याला सर्व पक्षांनी बिनशर्त पाठिंबा द्यावा. जर घाणेरडं राजकारण थांबवले नाही, तर बसप रस्त्यावर उतरेल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
मायावती म्हणाल्या, “या गंभीर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे. अशावेळी राजकीय आरोप-प्रत्यारोप, पोस्टरबाजी आणि भडक वक्तव्यं करून जनतेत संभ्रम पसरवणे देशाच्या हिताचे नाही. काँग्रेस आणि समाजवादी पक्षांनी याचा गांभीर्याने विचार करावा.”
त्यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातही स्पष्ट भूमिका मांडली. “या विषयावरून बाबासाहेबांचा कोणत्याही प्रकारे अपमान होता कामा नये. अन्यथा बसप अशा प्रवृत्तीविरोधात रस्त्यावर उतरेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, काँग्रेसने अलीकडेच आपल्या नेत्यांना पहलगाम हल्ल्याबाबत बोलताना पक्षशिस्त पाळण्याचे आदेश दिले होते. कोणतेही अनधिकृत, भडक वक्तव्य केल्यास कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, काही काँग्रेस नेत्यांनी या आदेशाकडे दुर्लक्ष करत भाजपवर हल्लाबोल केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सुरक्षेच्या मुद्यावर बसपने आपली भूमिका स्पष्ट करत इतर पक्षांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ही प्रतिक्रिया केवळ राजकीय टीका नसून, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर राजकीय एकजूट दाखवण्याचे एक आवाहन असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
Put aside political differences for the good of the country, otherwise BSP will take to the streets, Mayawati warns Congress, SP parties
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती